वाहनांना पेट्रोल-डिझेल विक्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 12:26 PM2020-04-01T12:26:33+5:302020-04-01T12:26:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा, नवापूर, तळोदा, नंदुरबार नगरपालिका, धडगाव नगर पंचायत आणि व अक्कलकुवा ग्रामपंचायत हद्दीतील पेट्रोल ...

Petrol-diesel sales close to vehicles | वाहनांना पेट्रोल-डिझेल विक्री बंद

वाहनांना पेट्रोल-डिझेल विक्री बंद

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा, नवापूर, तळोदा, नंदुरबार नगरपालिका, धडगाव नगर पंचायत आणि व अक्कलकुवा ग्रामपंचायत हद्दीतील पेट्रोल पंपावरून सर्व दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना पेट्रोल व डिझेलचे वितरण बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होणार आहे़
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली आहे़ परंतू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची सवलत देण्यात आली आहे. या सवलतीलचा गैरफायदा घेऊन काही नागरिक अनावश्यकरित्या दुचाकी व इतर वाहनांमधून फिरत असतात. त्यामुळे प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर प्रतिकूल परिणाम होण्याची आणि करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने पेट्रोल आणि डिझेलचे वितरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे़ शासनाने निर्धारित केलेल्या शहरी भागात पेट्रोलपंप धारकांनी केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांनाच पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून द्यावे. अत्यावश्यक सेवा पुरवणाºया वाहनांसाठी तसे पासेस नगरपालिका मुख्याधिकारी व ग्रामपंचायत अक्कलकुवा ग्रामसेवक यांनी देण्याचे आदेश आहेत़ नागरिकांनी किराणा, दूध, भाजीपाला व औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आवश्यकता असेल त्यावेळी वाहनाचा वापर करू नये. अशावेळी शक्यतो जवळच्या ठिकाणावरून वस्तू खरेदी कराव्यात, असेही या आदेशात म्हटले आहे़ नागरिकांना त्यांच्या घराजवळ जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होण्यासाठी तालुका प्रशासनामार्फत वॉड व कॉलनीनिहाय नियोजन करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करणाºया पेट्रोल पंप धारकांवर फौजदारी कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़

Web Title: Petrol-diesel sales close to vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.