लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : उन्हाळी हंगामातील प्रमुख नगदी पिकांची नंदुरबार तालुक्यात ठिकठिकाणी लागवड करण्यात आली आहे. परंतु त्यावर पांढऱ्या माशा व अन्य किटकांचा प्रादुर्भाव झाला आहे.नंदुरबार तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडून डांगर व टरबुज या उन्हाळी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यंदा या पिकांचे क्षेत्र लहान शहादा, कोरीट, भागसरी, कोळदा व समशेरपूर या भागात अधिक आहे. यावर्षी फेब्रुवारीपर्यंत किरकोळ समस्या वगळता अवकाळीसारखी मोठी परिस्थिती ओढवली व नव्हती, त्यामुळे या पिकांची चांगलीच वाढ झाली. मात्र होळीच्या कालावधीत ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा काही अंशी शिडकावा झाल्यामुळे हे पिक अडचणक्षत सापडले.किरकोळ पाऊस झाल्यानंतर या पिकांवर पांढºया माशा व अन्य किटकांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणी निर्माण झाल्या आहे. यावर मात करण्यासाठी त्यांची धावपळ सुरु आहे. माशा व किटकांच्या नियंत्रणासाठी समशेपूर भागातील शेतकरी तज्ञांच्या सल्ल्यानुसार किटकनाशकांची फवारणी करीत आहे.
डांगरवर किटकांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:14 IST