शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सानेगुरुजींच्या पत्रांतील व्यक्तिरेखा सहा दशकांनीही भेटतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 06:43 IST

सानेगुरुजींनी अर्थात अण्णांनी लिहिलेली पत्रे हा माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहेत. या पत्रांतील व्यक्तिरेखा आज सहा दशकांनंतरही भेटतात, तेव्हा खऱ्या अर्थाने तो पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळतो

- रमाकांत पाटीलनंदुरबार : सानेगुरुजींनी अर्थात अण्णांनी लिहिलेली पत्रे हा माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहेत. या पत्रांतील व्यक्तिरेखा आज सहा दशकांनंतरही भेटतात, तेव्हा खऱ्या अर्थाने तो पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळतो, अशी प्रतिक्रिया सानेगुरुजींची पुतणी सुधाताई बोडा यांनी ‘लोकमत’कडे दिली. गुरुजींच्या आंतरभारतीच्या स्वप्नाला गती मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.जून १९४९ ते जून १९५० या वर्षभराच्या काळात प्रत्येक आठवड्याला एक अशी पत्रे सानेगुरुजींनी आपली पुतणी सुधाला लिहिली होती. सध्या सुधा बडोदा येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी वयाची ८५ वर्षे पूर्ण केली असून, एक व्रतस्थ जीवन त्या जगत आहेत.‘मी १३ वर्षांची असतानाच अण्णा गेले. तत्पूर्वी ते भूमिगत व कारावासातच होते. १९४८ ते १९५० या काळात त्यांचा काही काळ सहवास लाभला. मात्र, याही काळात त्यांच्या जेवढा काळ ते घरी असायचे, त्या काळातही घरी होणाºया बैठका, नियोजन, भेटीसाठी येणाºयांचा राबता, यामुळे खूप कमी त्यांच्याशी संवाद साधता आले, पण त्यांची पत्रे आपल्या आयुष्यातील अनमोल ठेवा राहिला. या पत्रात त्या-त्या काळाचे अनेकांचे संदर्भही आहेत,’ असे सुधाताई यांनी सांगितले.गेल्याच वर्षी आपण कर्नाटकातील गदगला गेलो होतो. गुरुजींनी १० जून १९५० ला शेवटचे पत्र लिहिले होते. त्यात गदग, धारवड, हुबळीबाबत लिहिले होते. तेथे गेल्यानंतर गुरुजींनी ज्या डॉ. अण्णासाहेब चाफेकरांबद्दल लिहीले होते, त्यांच्या घरी आपण गेलो. त्याच गावातील ज्या मंदिराचे वर्णन गुरुजींनी केले होते त्या मंदिरातील पुजाºयाला भेटता आले. अशा कितीतरी व्यक्तीरेखा पुन्हा भेटतात, असेही त्या म्हणाल्या.‘श्यामची आई’ जपानी भाषेतहीमाझ्या नातीची मैत्रीण बंगळुरू येथे शिक्षण घेत आहे. तिच्या शाळेत जपानी मुलगी शिक्षण घेत होती. जपानच्या शिक्षिका शोकोनाका गावा यांनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक जापानी भाषेत छापून जपानमध्ये लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे पुस्तक जपानच्या अनेक कुटुंबांमध्ये संस्कार रुजविण्याचे काम करीत असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. अशा बाबी जेव्हा आपल्याला कळतात, तेव्हा खरोखरच मनाला खूप खूप आनंद होतो, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र