शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

लोक शिरले जंगलात अन् बिबटय़ा आला गावात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:06 IST

जिल्ह्यात चिंतेचा विषय : वनविभागाच्या निष्काळजीपणाचे फलीत

-रमाकांत पाटीलजिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात बिबटय़ांचा धुमाकूळ सुरू झाला असून त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे. विशेषत: उसाच्या शेतात या बिबटय़ांचे वास्तव्य वाढल्याने ऊस तोडणीसाठी शेतकरी आणि साखर कारखान्यांची           डोकेदुखी वाढली आहे. दोन दिवसांपूर्वीच ऊस तोडणी करणा:या एका मजुराच्या मुलाचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने जनमानसात अधिकच संतप्त वातावरण आहे. एकूणच जिल्ह्यातील जंगल दिवसेंदिवस नष्ट होत असून वनविभाग व प्रशासनाचे लाखोंच्या वृक्ष लागवडीचे आकडे केवळ कागदावरच रंगवले जात असल्याने ही परिस्थिती निर्माण होत असून आता सर्वानीच त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.नंदुरबार जिल्हा तसा राज्यात जंगल क्षेत्राच्या बाबतीत आघाडीचा जिल्हा. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ पाच हजार 961 स्क्वे. किलोमीटर असून त्यापैकी दोन हजार 392 स्क्वे. किलोमीटर क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. अर्थातच जिल्ह्याचे एकूण जंगल क्षेत्र 44 टक्के आहे. त्यातही सातपुडय़ाचे जंगल हे राज्यात एकेकाळी प्रसिद्ध जंगल मानले जायचे. सागाचे जंगल म्हणून त्याची ख्याती होती. परंतु रेल्वे मार्गासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड झाली. त्यानंतर पुढे स्वातंत्र्यानंतरपासून तर 80 च्या दशकार्पयत जंगल तोडीबाबत शासनाचेही उदासीन धोरण होते. ‘मोळी विकू पण शाळा शिकू’ असे घोषवाक्य शासनानेच तयार करून एकप्रकारे जंगल तोडीला प्रोत्साहन दिले होते. सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात 33 गावे व त्या भागातील जंगल बुडाल्याने त्यातही मोठी जंगलाची हानी झाली. त्याची भरपाई म्हणून 55 लाख वृक्ष लागवड करण्यात आले. अलिकडच्या काळातदेखील 11 कोटी, 22 कोटी, 33 कोटी, 55 कोटी अशा वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात            लाखो रोपांची लागवड करण्यात आली. पण प्रत्यक्षात मात्र आज जंगल शोधूनही सापडेना, अशी अवस्था आहे. सातपुडय़ाची टेकडी पूर्णपणे बोडकी आहे. या भागात सावलीसाठीही झाड शोधावे लागते. जंगलच नष्ट होत असल्याने त्याचे अनेक परिणाम सध्या जिल्हा सोसत आहे.या पाश्र्वभूमीवर सध्या उद्भवलेली सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर बिबटय़ांचे वास्तव्य गावाकडे व शेताकडे झाले आहे. रोज कुठल्या ना कुठल्या गावात बिबटय़ा दिसतो. काही ठिकाणी शेळ्या-मेंढय़ा, गाय, बैल, घोडे तो फस्त करीत असतो. या घटनांमुळे त्या त्या गावात भीतीचे वातावरण पसरते. सध्या उसाच्या शेतांमध्ये बिबटय़ांचे वास्तव्य अधिक दिसून येत आहे. साखर कारखाने सुरू झाल्याने ऊसतोडही मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. पण ऊस तोडणीसाठी गेलेल्या मजुरांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. उसाच्या शेतातून हा बिबटय़ा बाहेर काढणे कठीण असल्याने कारखाना आणि शेतक:यांच्या संगनमताने ऊस तोडणीसाठी उसाच्या शेतालाच आग लावावी लागत असल्याच्या अनेक घटना अलिकडच्या काळात घडल्या. यामुळे जळालेल्या उसामुळे वजन कमी होत असल्याने त्याचा शेतक:यालाही व तसा ऊस कारखान्यांना गाळप करावा लागत असल्याने कारखान्यांचेही नुकसान होत आहे. काही ठिकाणी तर या बिबटय़ांमुळे ऊस तोडणारे मजूर जखमी झाल्याच्या घटना घडल्या. दोन दिवसापूर्वीच इस्लामपूर, ता.शहादा शिवारात ऊस तोड सुरू असताना एका मजुराच्या आठ वर्षाच्या मुलालाच बिबटय़ाने लक्ष्य केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.एकूणच गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बिबटय़ांचे ग्रामीण भागातील वास्तव्याच्या व त्यामुळे जनजीवन भयभीत झाल्याच्या बातम्या सातत्याने येत असतानाही वनविभाग आणि प्रशासनाने           अजूनही त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे एकूणच हा विषय अधिकच चिंताजनक झाला आहे. या घटना रोखण्यासाठी आणि जिल्ह्यातील जंगल प्रामाणिकपणे वाढवण्यासाठी व राखण्यासाठी आता सर्वानीच प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. वनविभागाने त्याची उच्चस्तरावर चौकशी करून आजवर लावलेल्या झाडांचे ऑडिट करून त्यावर चिंतन करण्याची गरज आहे.