मेळाव्यात बोलताना आमदार डाॅ. गावित यांनी सांगितले की, पीक कर्ज वाटपासाठी तसेच शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी बँकिंग क्षेत्रातील व शासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करा व शेतकऱ्यांनीही पीक कर्जासह विविध योजनेचे कर्ज वितरित करण्यासाठी बँकेची कागदपत्रांची पूर्तता करून विविध योजनेचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज, मुद्रालोन, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच बँकांनी शेतकऱ्यांना युवकांना व व्यापाऱ्यांना सहकार्य करावे. बँकेचे उपविभागीय व्यवस्थापक कमल रंगनानी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देऊ. कागदपत्रांची पूर्तता केल्यास बँकेला अडचणी येत नाही. शेतकऱ्यालाही अगदी वेळेवर कर्ज उपलब्ध होते. प्रास्ताविक सेंट्रल बँकेचे मॅनेजर मनोज एल्केवार यांनी केले. तर सूत्रसंचालन भूषण गवळे यांनी तर आभार ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे यांनी मानले. यशस्वितेसाठी मंडळ अधिकारी जुबेर पठाण, तलाठी डिगराळे, कृषी विभागातील कर्मचारी, मंदिर संस्थान पदाधिकारी, बँकिंग कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सारंगखेडा येथे पीककर्ज वाटप मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:37 IST