परीक्षांच्या नवीन वेळापत्रकाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 12:13 PM2020-10-01T12:13:49+5:302020-10-01T12:13:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/जळगाव : विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या लेखनी बंद आंदोलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा ...

Pay attention to the new schedule of exams | परीक्षांच्या नवीन वेळापत्रकाकडे लक्ष

परीक्षांच्या नवीन वेळापत्रकाकडे लक्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार/जळगाव : विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या लेखनी बंद आंदोलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या १ आक्टोंबर पासून सुरू होणाºया अंतिम वर्ष / अंतिम सत्राच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या तातडीने झालेल्या बैठकीत आधीच जाहीर झाला आहे.
पदवीच्या अंतीम वर्षाच्या परीक्षांना १ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार होती. त्यादृष्टीने तयारीही करण्यात आली होती. विद्यार्थी देखील परीक्षेसाठी सज्ज झाले होते. परंतु शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लेखणी बंदमुळे हा परीक्षा आता १ आॅक्टोबर रोजी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुलगुरू पी. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सायंकाळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाची आॅनलाईन बैठक झाली. या बैठकीत मंडळाच्या सर्व सदस्यांचे मत जाणून घेण्यात आले.
२४ सप्टेंबर पासून राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन कर्मचाºयांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी लेखनी, अवजार बंदसह ठिय्या आंदोलन पुकारले आहे. तसेच १ आॅक्टोबर पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सध्या सहा दिवसांपासून परीक्षांबाबतची सर्व कामे ठप्प झाली आहेत.
या परिस्थितीत आॅफलाईन व आॅनलाईन परीक्षा घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या परीक्षा तुर्त पुढे ढकलाव्यात अशी सर्व सदस्यांनी एकमताने भावना व्यक्त केली. कर्मचाºयांच्या सहकार्याशिवाय या परीक्षा घेणे शक्य नाही असेही मत सदस्यांकडून मांडण्यात आले.
अखेर कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील यांनी सर्व सदस्यांचे मत जाणून या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगितले व परीक्षेच्या पुढील तारखा व नवीन वेळापत्रक आंदोलनाची परिस्थिती पाहून जाहीर केले जाईल असे सांगितले असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली. या बैठकीत प्र-कुलगुरू, सर्व अधिष्ठाते, सहयोगी अधिष्ठाते व सदस्य उपस्थित होते.


शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लेखनी बंद आंदोलनाबाबत राज्यस्तरावरून आज काही घडामोडी होतात किंवा कसे यावर परिक्षांचा निर्णयही अवलंबून होता. परंतु लेखनीबंद कायम असल्यामुळे परीक्षा होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नवीन वेळापत्रक कधी जाहीर होते याकडे आता विद्यार्थी, प्राध्यापकांचे लक्ष लागून आहे.

 

Web Title: Pay attention to the new schedule of exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.