स्वच्छ उपक्रमातून १०० शाळांमध्ये परसबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:03 PM2020-02-17T12:03:52+5:302020-02-17T12:04:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शाळा परिसर स्वच्छतेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात जिल्हा प्रशासन, सलाम मुंबई फाऊंडेशन व नवनिर्माण ...

Parasbagh in 5 schools through a clean program | स्वच्छ उपक्रमातून १०० शाळांमध्ये परसबाग

स्वच्छ उपक्रमातून १०० शाळांमध्ये परसबाग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शाळा परिसर स्वच्छतेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात जिल्हा प्रशासन, सलाम मुंबई फाऊंडेशन व नवनिर्माण संस्थेमार्फत १०० शाळांमध्ये परसबाग तयार करण्यात येत आहे. शिवाय घरी परसबाग निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना बियाणेही उपलब्ध करुन दिले जात आहे.
जिल्ह्यात तंबाखूमुक्तीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सुदृढ आरोग्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्या पाठोपाठ शाळा परिसर स्वच्छतेसाठी परसबागाही तयार करण्यात येत आहे. त्यात एकुण १०० शाळांमध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार परसबागेसाठी साहित्य पुरविण्यात आले आहे. तर शाळेतील विद्यार्थ्यांनाही घरी जागा उपलब्ध नुसार परसबाग निर्मितीसाठी बियाणे देण्यात आले. यातून विद्यार्थ्यांसह पालकांनाही सकस आहार मिळणार आहे. पावला ता.नंदुरबार येथे शाळा व परिसर अभियान अंतर्गत गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात ग्रामस्थांसह महिला बचत गटांनीही सहभाग घेतला. स्वच्छतेविषयी जनजागृतीसाठी रॅलीही काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांसह सरपंच ज्योतीपाल वळवी, उपसरपंच वळवी, नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी, समीर वळवी, रोहिणी वसावे, प्राचार्य के. व्ही.चौधरी, प्राथमिक मुख्याध्यापक एन.ए.देसले, निलेश पाटील, एन.टी.शिंदे, ए.व्ही.वळवी आदी उपस्थित होते.

Web Title: Parasbagh in 5 schools through a clean program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.