व्यापारी येत नसल्याने पपई झाडावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:54 AM2020-03-31T11:54:20+5:302020-03-31T11:54:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच्या फटका पपई उत्पादक ...

The papaya was on the tree as the merchant did not come | व्यापारी येत नसल्याने पपई झाडावरच

व्यापारी येत नसल्याने पपई झाडावरच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच्या फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला असून व्यापारी पपई तोडण्यासाठी धजावत नाही. त्यामुळे झाडावरील फळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे लाखोंमध्ये नुकसान होत आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकºयांना कोरोनाने संकटात आणले आहे.
शहादा तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईचे उत्पादन घेतले जाते. पपई हे इतर पिकांपेक्षा वेगळे आहे. शिवाय नाशिवंत असल्याने साठा ही करता येत नाही. यंदा पपईची लागवड उशिराने झाल्याने आता फळ निघण्यास सुरुवात झाली. परंतु तोडणीच्या हंगामात प्रथमता व्यापाºयांनी किमतीबाबत शेतकºयांना वेठीस धरले होते. तो तोडगा निघत नाही तोच पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे वाहन पपई भरण्यासाठी शेतमजूर येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जेमतेम खर्चही निघाला नसतानाच कोरोना धडकल्याने पपई झाडावरच पिकत आहे. जिल्हा बंदीचे कारण पुढे करत पपई खरेदीदार व्यापारी धजावत नाही. त्यामुळे पपईची तोडणीही बंद असून झाडावरच नुकसान होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातून रोज उत्तर प्रदेश व इतर भगत १०० पेक्षा अधिक ट्रक पपई जात असते. परंतु सद्यस्थितीत ट्रान्सपोर्टच बंद झाल्याने एकही पपई व्यापारी जिल्ह्यात यायला तयार नाही. पपई तोडली तरी अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी अनेक विघ्ने येणार असल्याचे कारण पुढे केले जात असून वाहतूकीचा प्र्रश्नही उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकाºयांनी शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी स्थानिक स्तरावर तोडगा काढावा अशी मागणी पपई उत्पादकांनी केली आहे.

Web Title: The papaya was on the tree as the merchant did not come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.