गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त पालखी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:23 PM2020-02-16T13:23:59+5:302020-02-16T13:24:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील पाताळगंगा नदी किनारी असलेल्या गजानन महाराज मंदिरात प्रगट दिनानिमित्त वार्षिक उत्सव साजरा करण्यात ...

Palanquin Ceremony for Gajanan Maharaj Revealed Day | गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त पालखी सोहळा

गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त पालखी सोहळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील पाताळगंगा नदी किनारी असलेल्या गजानन महाराज मंदिरात प्रगट दिनानिमित्त वार्षिक उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मंदिरावर भाविकांनी गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले.
शनिवारी ‘श्रीं’च्या रजत मुखवट्याची शहरातून भव्य पालखी काढण्यात आली. श्री गजानन महाराज मंदिर नंदुरबार येथून सकाळी नऊ वाजता पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला होता. या वेळी शहरातील साक्री नाका, जळका बाजार, टिळक रोड, सोनार खुंट, गणपती मंदिर, धान्यबाजार, सिद्धी विनायक मंदिर, शिवाजी रोड मार्गे हिरालाल चौधरी यांच्या घराकडून मंदिरात पालखी आल्यानंतर महाआरती व प्रसादाने सोहळ्याची सांगता करण्यात आली. पालखी सोहळ्यात रजाळे व काकर्दे येथील भजनी मंडळांनी विविध भक्ती गीत गात शहरात भक्तीमय वातावरण निर्माण केले. या वेळी पालखीचे भाविकांनी ठिकठिकाणी दर्शन घेतले.
पालखी सोहळ्यासाठी सद्गुरू सेवा संघाच्या सेवेकऱ्यांसह भाविकांनी परिश्रम घेतले.

Web Title: Palanquin Ceremony for Gajanan Maharaj Revealed Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.