शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

पाडव्याची उलाढाल यंदा ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मराठी नववर्षाचे स्वागत घरात राहूनच करीत कोरोनापासून मुक्तीसाठी शहरवासीयांनी देवाला साकडे घातले. प्रथमच गुढीपाडव्याला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मराठी नववर्षाचे स्वागत घरात राहूनच करीत कोरोनापासून मुक्तीसाठी शहरवासीयांनी देवाला साकडे घातले. प्रथमच गुढीपाडव्याला कुठलीही उलाढाल झाली नसल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत बाजारात तुरळक गर्दी होती. लॉकडाऊनच्या दुसºया दिवशी प्रशासन आणि पोलिसांनी शहरात विनाकारण येणाºया नागगरिकांना लाठीच्या प्रसादाऐवजी समजवून सांगत रवाना केले. असे असले तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अन्यथा पुन्हा पोलिसांना सक्तीने वागावे लागेल असा इशाराही पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.मराठी नववर्षाचे स्वागत गुढीपाडव्याने केले जाते. या निमित्त सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण असते. परंतु कोरोना इफेक्टमुळे यंदाचा गुढीपाडवा चैतन्याऐवजी घरात बसूनच साजरा करावा लागला. शहरी भागात ही स्थिती होती. परंतु ग्रामिण भागात बºयापैकी उत्साह होता. तरीही नागरिकांनी लॉकडाऊनचा आदर करीत घराबाहेर पडण्याचे टाळल्याचे चित्र होते.शुन्य उलाढाल असलेला पाडवापाडव्याच्या शुभमुहूर्तावर बाजारात मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. अनेकजण नवीन संवत्सराचा मुहूर्त साधून वाहन खरेदी, घर, प्लॉट खरेदी, बांधकामाचा शुभारंभ, वस्तू खरेदी, सोने खरेदी करीत असतात. त्यामुळे बाजारातील उलाढाल मोठ्या प्रमाणावर असते. व्यापाऱ्यांच्या दृष्टीने पाडव्याची उलाढाल ही संधी असते. परंतु यंदाचा पाडवा हा कुठलीही उलाढाल न करता गेल्याने व्यापाºयांचे व रियल इस्टेटमधील व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नोटाबंदीमधून जेमतेम बाजार सावरला असतांना आता कोरोनाने पुन्हा तो मोडीत काढला असल्याच्या प्रतिक्रया अनेक व्यापाºयांनी व्यक्त केल्या. असे असले तरी काही प्रमाणात नुकसान सहन करू शकतो, परंतु कोरोनाचा मुकाबला करू शकत नाही. त्यामुळे यंदाचा पाडवा व्यवसाय देवून गेला नाही तरी काही खंत नाही असेही मनोमन समाधान व्यक्त करीत व्यापाºयांनी या राष्टÑीय आपत्तीत आपण देशवासीयांसोबत असल्याचे सांगितले.आंबे व मिठाई लांबचगुढीपाडव्याला आंब्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. यंदा मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून आंब्यांची आवकच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे फळ विक्रेत्यांनी त्यांच्याकडे असलेला जुना स्टॉकमधीलच आंबे विक्री केले. त्यामुळे भाव तब्बल २०० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत होते.याशिवाय पाडव्याला गोड पदार्थांनाही मोठी मागणी असते. परंतु सर्वच हॉटेल्स बंद असल्याने कुणीही नवीन गोड पदार्थ बनविला नाही. परिणामी त्याची विक्रीही झाली नाही. त्यामुळे मिठाईपासून देखील यंदाचा पाडवा लांब राहिल्याचे चित्र होते.बाजारात गिºहाईकीच नसल्याने किरकोळ व्यापाºयांचे देखील मोठे नुकसान झाले. साखरेच्या गाठी, फुल यांची विक्री नव्हतीच.घरातूनच शुभेच्छांचा वर्षावघरात राहून अनेकांनी एकमेकांना सोशल मिडियाच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. एकमेकांशी हस्तांदोलन किंवा स्पर्श टाळण्याचे आवाहन करण्यात आल्याने वसाहतीत किंवा खरेदीसाठी शहरात आलेल्यांनीही एकमेकांना लांबूनच शुभेच्छा दिल्या. सकाळपासूनच सोशल मिडियावरील शुभेच्छांची देवानघेवान सुरू होती.

कोरोनाच्या जागृतीसाठी आणि प्रत्येकाने मास्क लावून काळजी घ्यावी हा संदेश देण्यासाठी अनेकांनी गुढीला देखील मास्क लावल्याचे दिसून आले. शिवाय स्वत:ही मास्क लावूनच गुढीची पूजा केल्याचे फोटो देखील अनेकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केले.गुढील लावण्यात येणारा लिंबाचा पाला हा कुठल्याही विषाणूला रोखण्यासाठी उपयोगी ठरतो. कोरोनाचा विषाणू रोखण्यासाठी देखील कडूलिंबाचा पाला उपयोगी ठरत असल्याचे काहींचे म्हणने आहे. त्यामुळे अनेकांनी हा पाला आपल्या खिडकी व दरवाजांवर लावला.