शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बँंकेसह शैक्षणिक कामासाठी एकच ‘कॉम्बो कार्ड’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 1:58 PM

संजय पाटील यांची संकल्पना: विद्यार्थ्यांचे छायाचित्र, क्रमांक आणि रक्तगटही दिसणार

भूषण रामराजे/नंदुरबार : विद्यार्थ्यांकडील ओळखपत्र आणि बँकेचे डेबिट कार्ड एकत्रित करण्याचा अनोखा प्रयोग पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) व स्टेट बँकेने एकत्र येऊन राबवला आहे. या ‘कॉम्बो कार्ड’ची मूळ संकल्पना आहे ती नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी डॉ. एस. एल. पाटील यांची. शहादा तालुक्यातील भादा येथील मूळ रहिवासी असलेले प्रा. डॉ. संजय लिमजी पाटील हे शासकीय पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता आहेत. इन्स्ट्रूमेंटेशन हा त्यांचा विषय.

विद्यार्थ्यांंना येणा-या अडचणी लक्षात घेत त्यांनी बँक आणि महाविद्यालय अशा दोन्ही ठिकाणी उपयोगी पडेल, असे एकच कार्ड तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला होता़ स्टेट बँकेने त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरत विद्यार्थ्यांना कार्ड देण्याबाबत अनुकूलता दर्शवली.बँकेच्या व्यवहारांसाठी देण्यात येणा-या या डेबिट कार्डमध्ये विद्यार्थ्यांची माहिती असलेली चीप टाकण्यात आली आहे. कार्डवर विद्यार्थ्यांचे छायाचित्र, त्याचा क्रमांक, रक्तगट आदी माहितीही देण्यात आली आहे. बँकेचे व्यवहार आणि महाविद्यालयातील शैक्षणिक कामे यासाठी आता एकाच कार्डचा वापर करता येणार आहे.

या कार्डात विद्यार्थ्यांचे नाव, क्रमांकासहित त्याची माहिती यावर आहे. तसेच ग्रंथालयात पुस्तक देवाण-घेवाणीसाठी विद्यार्थ्यांची ओळख पटावी, म्हणून या कार्डमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी चीप बसविण्यात आली आहे. ग्रंथालयात गेल्यानंतर आरएफआयडी चीप रीडरद्वारे विद्यार्थ्यांची सर्व माहिती मिळू शकेल. महाविद्यालयातील प्रयोगशाळा, तसेच दरवाजा उघडण्यासाठीही याचा उपयोग होईल, असा दावा पाटील यांनी केला आहे.‘डेबिट कार्डवरच ओळखपत्र करता आले तर, हा विचार पुढे आला आणि स्टेट बँकेच्या अधिका-यांबरोबर यासंबंधी चर्चा केली. त्यांनी महाविद्यालयाची गरज लक्षात घेऊन त्यानुसार कार्डमध्ये बदल केले आणि एकच कार्ड तयार केले आहे. त्याचा उपयोग एटीएममधून पैसे काढण्याबरोबरच कँटीनमधील बिल देण्यासाठी होणार आहे़ याशिवाय महाविद्यालयातील शैक्षणिक कामासाठीही ते उपयोग करता येईल.- प्रा.डॉ. एस. एल. पाटीलहे कॉम्बो कार्ड आर्थिक व्यवहार आणि शैक्षणिक कामकाजासाठी वापरता येईल. यातील आरएफआयडी चीप सीओईपीची असणार आहे.- डी.बी.बी. आहुजा, संचालक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय१२०० विद्यार्थ्यांना कार्डचे वाटप४महाविद्यालय आणि स्टेट बँक आॅफ इंडिया यांच्या पुढाकाराने १२०० विद्यार्थ्यांना या कॉम्बो कार्डचे वाटप करण्यात आले आहे़ बाजारपेठेत कोठेही असलेल्या पीओएस मशीनमध्ये हे कार्ड टाकल्यास विद्यार्थ्यांना व्यवहार करता येतील.

 

टॅग्स :bankबँक