६४ ग्रामपंचायतींत निवडणूक लढणाऱ्या एक हजार उमेदवारांचा आज होणार फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:28 AM2021-01-18T04:28:58+5:302021-01-18T04:28:58+5:30

या मतदानानंतर सोमवारी सकाळी तहसीलदार कार्यालय स्तरावर त्या-त्या ठिकाणच्या तहसीलदारांच्या निरीक्षणात मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी नंदुरबार येथे सात, शहादा ...

One thousand candidates contesting in 64 Gram Panchayats will be decided today | ६४ ग्रामपंचायतींत निवडणूक लढणाऱ्या एक हजार उमेदवारांचा आज होणार फैसला

६४ ग्रामपंचायतींत निवडणूक लढणाऱ्या एक हजार उमेदवारांचा आज होणार फैसला

Next

या मतदानानंतर सोमवारी सकाळी तहसीलदार कार्यालय स्तरावर त्या-त्या ठिकाणच्या तहसीलदारांच्या निरीक्षणात मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी नंदुरबार येथे सात, शहादा येथे आठ, धडगाव येथे आठ, नवापूर येथे सहा, अक्कलकुवा येथे एक, तर तळोदा येथे तीन टेबल मांडून मोजणी करण्यात येणार आहे. मतदान झाल्यानंतर सीलबंद केलेली एव्हीएम यंत्रे आज, सोमवारी बाहेर काढण्यात येणार आहेत. मतमोजणीनंतर धडगाव तालुक्यातील १३४ सदस्य पदाच्या जागांसाठी ३३३, शहादा तालुक्यातील १६४ जागांसाठी ४४९, नंदुरबार तालुक्यात ६४ जागांसाठी १४४, तळोदा तालुक्यात ५१ जागांसाठी १३४, तर अक्कलकुवा तालुक्यात नऊ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांनी तब्बल १० दिवस प्रचार केला होता. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गावोगावी झालेल्या बैठका आणि सभा यांमुळे राजकीय वातावरण तापले होते. प्रमुख राजकीय पक्षांसोबत काम करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचे अस्तित्व या निवडणुकांमुळे पणास लागले आहे.

Web Title: One thousand candidates contesting in 64 Gram Panchayats will be decided today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.