धडगावनजीक दुचाकी अपघातात एकजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:55 PM2020-11-09T12:55:42+5:302020-11-09T12:55:51+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  भरधाव दुचाकी घसरल्याने एकजण जागीच ठार झाल्याची घटना धडगाव-शहादा रस्त्यावर देवबारा घाटात घडली.  धडगाव ...

One killed in two-wheeler accident near Dhadgaon | धडगावनजीक दुचाकी अपघातात एकजण ठार

धडगावनजीक दुचाकी अपघातात एकजण ठार

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  भरधाव दुचाकी घसरल्याने एकजण जागीच ठार झाल्याची घटना धडगाव-शहादा रस्त्यावर देवबारा घाटात घडली.  धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
भगतसिंग ओल्या वसावे (४०) रा.वेली, ता.अक्कलकुवा असे मयताचे नाव आहे. भरगतसिंग हे ७ रोजी आपल्या दुचाकीने शहादा येथून धडगावकडे जात होते. देवबारा घाटात उतारावर अचानक त्यांची दुचाकी (क्रमांक एमएच ३९ टी ९४०७) अचानक घसरली. त्यात भगतसिंग वसावे हे जबर जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. 
याबाबत गौतम राहसे यांनी फिर्याद दिल्याने धडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार संजय मनोरे करीत आहे. 

Web Title: One killed in two-wheeler accident near Dhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.