नंदुरबार : भरधाव ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक खड्ड्यात आदळून चालक जागीच ठार, तर सहचालक गंभीर जखमी झाल्याची घटना रनाळेनजीक घडली. दोंडाईच्याकडून नंदुरबारकडे येणाºया ट्रकवरील (क्रमांक एमएच २०-एपी ६०१४) चालकाचा रनाळेनजीक काठोबा देवस्थानाच्या वळणावर अचानक ताबा सुटला. त्यामुळे ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडला. त्यात चालक किरण माणिक बनसोडे (२१) रा. अजिंठा, ता.सिल्लोड याचा जागीच मृत्यू झाला, तर सहचालक शक्तीसिंग गुमानसिंग ठाकूर हा जखमी झाला. ट्रकमध्ये सिमेंटच्या गोण्या भरल्या होत्या. त्यामुळे ट्रकवरील ताबा सुटल्याचे बोलले जात आहे. अपघाताची खबर तालुका पोलिसांना दिल्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत शाहरूख शेख हुकामान शेख यांच्या फिर्यादीवरून शक्तीसिंग गुमानसिंग ठाकूर याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रक अपघातात एक ठार
By admin | Updated: March 2, 2017 23:04 IST