नंदुरबार : नवापूर तालुक्यातील कोळदे येथे घर बांधण्याच्या वादातून तिघांनी एकास बेदम मारहाण केली़ ही घटना शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली़अमरसिंग बावा वसावे यांची कोळदा येथे जागा आहे़ त्याठिकाणी जालमसिंग वसावे यास घर बांधू द्यावे अशी विचारणा किरण भगतसिंग वसावे याने केली होती़ त्यास अमरसिंग वसावे यांनी नकार दिला होता़ याचा राग आल्याने अमरसिंग वसावे यांना किरण वसावे, अब्दास भगतसिंग वसावे, जालमसिंग वसावे यांनी डेंगाऱ्याने मारहाण केली करुन शिवीगाळ केली होती़ मारहाणीत अमरसिंग वसावे यांना दुखापत झाली होती़याबाबत अमरसिंग वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कोळद्यात घर बांधण्याच्या वादातून एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:11 IST