नवापूर तालुक्यातील पानबारा नजीक बस व ट्रालाच्या अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 09:47 PM2019-02-16T21:47:13+5:302019-02-16T21:47:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील पानबारा येथील नदीच्या पुलावर लक्झरी बस व ट्राला यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात ...

 One killed in bus accident near Pambara in Navapur taluka and trawler | नवापूर तालुक्यातील पानबारा नजीक बस व ट्रालाच्या अपघातात एक ठार

नवापूर तालुक्यातील पानबारा नजीक बस व ट्रालाच्या अपघातात एक ठार

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील पानबारा येथील नदीच्या पुलावर लक्झरी बस व ट्राला यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण ठार तर १५ जण जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडला. अपघातामुळे दोन्ही बाजूने चार तासापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग सहावर पानबारा येथील नदीच्या पुलावर मालेगावहून सूरतकडे भरधाव वेगाने जाणारी लक्झरी बसने (क्रमांक जीजे १४ एक्स २२५०) सूरतकडून धुळ्याकडे जाणाऱ्या ट्राल्याला (क्रमांक सीजी ०४ जेए ८१९०) यास धडक दिली. या अपघातात लक्झरी बसमधील पंधरा जण जखमी झाले. त्यात सायराबानू सय्यद अली (२५), भिलुबाई सुरेश माळी (४५), शोभाबाई बाबुलाल माळी (४५), नजमाबी शेख समसुद्दिन (६०), नजमा शेख शकील (४८), सर्व राहणार सुरत तसेच शौकत अली (२५), इम्रान खान ताज खान (२५), अब्दुल अली लतीफ (४५), अनिसा बानु मजीत खान (४०), व इतर असे पंधरा जण जखमी झाले़ त्यापैकी एका जखमीचा सुरत येथे मृत्यू झाला. मयताचे नाव समजू शकले नाही. विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व कर्मचारी नाका बंदीची तपासणी करीत असताना माहिती मिळाली़

Web Title:  One killed in bus accident near Pambara in Navapur taluka and trawler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.