शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

दीड हजार विद्यार्थी व मजूर गुवाहाटीकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:31 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या जामिया संकुल येथील १,५१८ विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील अन्य ७० मजूर असे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या जामिया संकुल येथील १,५१८ विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील अन्य ७० मजूर असे १,५८८ प्रवाशांना विशेष श्रमीक एक्स्प्रेसने झारखंड, बंगाल व आसामला पाठविण्यात आले.यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत,अविश्यांत पांडा, अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील,उपजिल्हाधिकारी कैलास कडलग,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, उपशिक्षणअधिकारी डॉ.युनूस पठाण, रेल्वेचे सहायक परीचालन प्रबंधक गुलाबसिंग गहलोत, जामिया संकुलाचे अध्यक्ष मौलाना गुलाम वस्तानवी, प्रिन्सिपल रफीक जहागिरदार, मौलाना जावेद पटेल आदी उपस्थित होते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या मजूरांमध्ये नंदुरबार येथील २६, तळोदा ७, नवापुर १८ , शहादा १२ तसेच साक्री येथील ७ अशा ७० मजूरांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थी व मजूराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दुपारी १ वाजेच्या सुमारास रेल्वे नंदुरबार स्थानकात दाखल झाली. प्रवाशांसह ही रेल्वे विद्यार्थी व मजूरांना घेवून गोहाटीच्या दिशेने २ वाजून ४० मिनीटांनी रवाना झाली.यावेळी पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांना बसमधून उतरवून सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत सर्वांना रेल्वेत बसविण्यात आले. जामिया मार्फत सर्व प्रवाशांना पिण्याचे पाणी, भोजन सामुग्री आणि मास्क उपलब्ध करून देण्यात आले होते. दुपारी एक वाजता बसेस भरून विद्यार्थी नंदुरबारात दाखल झाले. त्यानंतर त्यांना क्रमाक्रमाने रेल्वे स्थानकात आणण्यात आले. तेथे शिस्तीने त्यांना फलाटावर नेवून रेल्वेत बसविण्यात आले. यावेळी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली गेली.