शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘ओखी’च्या तडाख्याने नंदुरबारमध्ये रब्बी पिकांवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 13:10 IST

जिल्ह्यातील विविध भागात पाऊस झाल्याने कापूस व हरभरा ओला

ठळक मुद्देअक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नवापूर, नंदुरबार, शहादा शहरांसह ग्रामीण भागात तुरळक पाऊसग्रामीण भागातील शेतशिवारात शेतकरी आणि मजूरांची धावपळदिवसभर पावसाची रिपरिप आणि ढगाळ वातावरण

आॅनलाईन लोकमतनंदुरबार,दि.६ : ओखी वादळाचा परिणाम जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून जाणवण्यास सुरूवात झाली़ यामुळे जिल्ह्यातील विविध भागात संततधार पाऊस होऊन शेतशिवार जलमय झाले़ पावसामुळे पेरणी झालेला गहू, फुलावर आलेला हरभरा आणि बोंडाबाहेर आलेला कापूस यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे़आज सकाळी अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नवापूर, नंदुरबार, शहादा शहरांसह ग्रामीण भागात तुरळक पावसाचे थेंब कोसळत होते़ मंगळवारी सकाळी ९ नंतर पावसाच्या मध्यम सरी बरसण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांची शहरी भागात नागरिकांची तर ग्रामीण भागातील शेतशिवारात शेतकरी आणि मजूरांची धावपळ उडाली़ हिवाळ्यात कोसळणाºया अतीशित सरींमुळे अनेकांना हुडहुडी भरली होती़ ओखी वादळामुळे जिल्ह्यात आगामी ३६ तास पावसाची स्थिती कायम राहणार आहे़शहादा शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी मंगळवारी अवकाळी पाऊस बरसल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला. शहरात सकाळी अवकाळी पावसाची सुरुवात झाली. पाठोपाठ तालुक्यातील सारंगखेडा, ब्राह्मणपुरी येथे पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शेतकरी, व्यापारी सर्वांचीच अडचण झाली. शहरात दुपारी १२ वा. सुमारास पावसाने चांगलाच जोर धरला सुमारे तासभर पाऊस झाला. तालुक्यात झालेल्या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला़ सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना आज सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर पावसाची रिपरिप आणि ढगाळ वातावरण होते़नंदुरबार शहर व तालुक्यातही सकाळपासून पाऊस झाला़ सकाळी आठ वाजेपासून सुरू झालेल्या पावसामुळे नंदुरबार शहरात नागरिकांची धावपळ उडाली होती़ मंगळवार असल्याने आठवडे बाजारासाठी आलेल्या भाजी विक्रेत्या महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पावसातच खरेदी न करताच परत गेले होते़ यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे़नवापूर शहर आणि तालुक्यात पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली. ती दिवसभर कायम राहिली. दुपारी तीन नंतर पावसाचा जोर वाढला होता़ मधून मधून ढगांचा गरजण्याचा आवाजही झाला. शेतांमधे काढुन ठेवलेला भुईमूग व भाताचा चारा या पावसात भिजल्याने पशुपालक व शेतकºयांचे नुकसान झाले.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ