शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

निवडणूकीसाठी ‘आयात’ करावे लागणार अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:41 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आगामी काळात होणा:या निवडणूक कामकाजासाठी जिल्हा प्रशासनाकडे उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नसल्याने जिल्ह्याबाहेरुन अधिकारी आयात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आगामी काळात होणा:या निवडणूक कामकाजासाठी जिल्हा प्रशासनाकडे उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नसल्याने जिल्ह्याबाहेरुन अधिकारी आयात करण्याची वेळ प्रशासनावर येणार आह़े सोबत नायब तहसीलदारांची पदेही रिक्त असल्याने अडचणी कायम राहण्याची चिन्हे आहेत़ गेल्या आठवडय़ात जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून डॉ़ राजेंद्र भारुड हे बदलून आले आहेत़ त्यांच्या प्रशासकीय बदलीनंतर लागलीच निवडणूकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यास  शहादा, नवापुर, नंदुरबार, धडगाव, तळोदा आणि अक्कलकुवा पंचायत समितीसाठी स्वतंत्रपणे नियुक्त करण्यात येणारे उपजिल्हाधिकारी दर्जाचे सहा निवडणूक निर्णय अधिकारीच नसल्याने कामकाज होणार कसे असा प्रश्न आह़े  आजअखेरीस जिल्हा प्रशासनात उपजिल्हाधिकारी दर्जाचे केवळ पाच अधिकारी आहेत़ यात 3 अधिकारी हे जिल्हा मुख्यालयी तर दोघे नेमून दिलेल्या तालुका मुख्यालयात कार्यरत आहेत़ यातच नायब तहसीदारांची पदेही रिक्त असल्याने निवडणूक कार्यक्रम राबवला जाणार कसा, असाही प्रश्न आह़े यावर पर्याय म्हणून नजीकच्या जळगाव किंवा नाशिक जिल्ह्यातून अधिकारी बोलावून कामकाज पूर्ण करण्यात येण्याची शक्यता आह़े जिल्हा परिषद निवडणूकांचा 30 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर लागलीच विधानसभा निवडणूकांचा 60 दिवसांचा कालावधीही असल्याने पुन्हा ‘ये रे माङया मागल्या’ हीच गत होणार असल्याचे बोलले जात आह़े निवडणूक प्रक्रियेदरम्यान अधिका:यांसोबत तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्याही बदल्यांची शक्यता असल्याने प्रशासनाच्या चिंता वाढण्याची शक्यता आह़े धडगाव आणि अक्कलकुवा तहसीलदार पदोन्नतीवर असल्याने त्यांची बदली होण्याची शक्यता आह़े तर शहादा तहसीलदार कार्यालयात नायब तहसीदारांची तब्बल चार पदे रिक्त आहेत़ याठिकाणी महिला नायब तहसीलदार  1 ऑगस्टपासून पदभार घेण्याची चिन्हे आहेत़ अक्कलकुवा येथे नायब तहसीलदारांची दोन पदे रिक्त आहेत़ 

प्रशासनात सध्या निवासी, निवडणूक शाखा, पुरवठा आणि सामान्य प्रशासन असे चारच उपजिल्हाधिकारी आहेत़ तर प्रांताधिकारी साताळकर हे उपजिल्हाधिकारी दर्जाचे आहेत़ नंदुरबारच्या प्रांताधिकारी वान्मती सी यांच्या बदलीनंतर साताळकर यांना नंदुरबारचा पदभार दिला गेला आह़े सहायक जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डुडी हे तळोद्यात कार्यरत आहेत़  नियुक्तीवर असलेल्या या  अधिका:यांच्या पदोन्नती बदल्यांचेही वारे अद्याप वाहत असल्याने रिक्त पदांबाबत अस्थितरता कायम आह़े