तापीला साडेपाचशे मीटरची अखंड साडी अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:15 PM2019-11-19T12:15:28+5:302019-11-19T12:15:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेनिमित्त त्रिवेणी संगमापासून सूर्यकन्या तापी नदीला ...

Offer a continuous saree of thirty-five meters to Tapi | तापीला साडेपाचशे मीटरची अखंड साडी अर्पण

तापीला साडेपाचशे मीटरची अखंड साडी अर्पण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेनिमित्त त्रिवेणी संगमापासून सूर्यकन्या तापी नदीला सुमारे साडेपाचशे मीटरची साडी कथाकार कनकेश्वरी देवी यांच्या हस्ते सोमवारी अर्पण करण्यात आली.
सोमवारी सकाळी नऊ वाजता तापी घाटावर कनकेश्वरी देवी यांच्या हस्ते विधीवत पूजा करून ही साडी अर्पण करण्यात आली.  सात नावाडय़ांमार्फत तापी नदीच्या पहिल्या टोकापासून तर दुस:या टोकार्पयत साडी अर्पण करण्यात आली. तोर्पयत घाटावर अखंड मंत्रोच्चार करण्यात आला. हे दृष्य पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी झाली होती. साडी दुस:या काठार्पयत पोहोचण्यासाठी सुमारे पाऊन तास लागला. यासाठी सर्व साधकांनी मदत केली. साडी अर्पण केल्यानंतर घाटावरच आलेल्या भाविकांना कनकेश्वरी देवी यांनी सांगितले की, नदीला प्रदूषणमुक्त करा, नदीत निर्माल्य टाकू नका, पाणी शुद्ध असेल तर आपले आरोग्य चांगले राहील. नदीला प्रदूषणमुक्त करणे हीदेखील गुरुसेवा असून ती सर्वानी करावी. गायीचे रक्षण, वेदांचा प्रचार, अन्नदान व सत्संगामध्ये सांगितलेले सर्व नियम जीवनात अंमलात आणा हे चार कार्य जर आपण व्यवस्थित केले तर जग सुखी होईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर नदी दूषित होणार नाही यासाठी उपस्थितांनी संकल्प केला. या वेळी पुणे येथील शरदचंद्र मुळे उपस्थित होते.
तापी नदीला अखंड साडी अर्पण करण्याचा पहिलाच कार्यक्रम असल्याने प्रकाशासह परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. त्यात महिलांचा सहभाग मोठा होता. कार्यक्रमास सरपंच, जि प. सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, संगमेश्वर मंदिर ट्रस्ट, केदारेश्वर मंदिर ट्रस्ट, भोई समाजाचे नावाडी, पोलीस उपस्थित होते. साधक परिवार आदींनी आदींनी सहकार्य केले.
 

Web Title: Offer a continuous saree of thirty-five meters to Tapi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.