सोशल मिडियावार आक्षेपार्ह मजकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 11:50 AM2020-04-05T11:50:08+5:302020-04-05T11:50:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सोशल मिडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी नंदुरबार व प्रकाशा येथील चार जणांविरुद्ध शहर पोलिसात ...

 Offensive text from social mediawar | सोशल मिडियावार आक्षेपार्ह मजकूर

सोशल मिडियावार आक्षेपार्ह मजकूर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सोशल मिडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी नंदुरबार व प्रकाशा येथील चार जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलिंद सोनवणे रा. चोलामंडलम मॅनेजर, जगतापवाडी, भावेश रा.पालिकेच्या बाजुला, योगेश चंद्रकांत माळी, रा.माळीवाडा व पंकज ईश्वर सोनार, रा.सोनारगल्ली, प्रकाशा असे संशयीतांची नावे आहेत. सध्या कोरोनामुळे पोलिसांनी शासनाने विविध कलमान्वये कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. परंतु तरीही काहीजण सोशल मिडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने मजकूर व फोटो टाकून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणत आहेत. सोनवणे व इतरांनी देखील त्यांच्या फेसबूक वॉलवर आणि व्हॉट्सअप स्टेटसवर दोन धर्मात तेढ निर्माण होईल या भावनेने मजकूर टाकला. राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांच्या विविध अधिसुचना व प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. फौजदार सुनील बिºहाडे यांनी फिर्याद दिल्याने नंदुरबार शहर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर करीत आहे.

Web Title:  Offensive text from social mediawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.