शाळेची मान्यता रद्द करण्यासंदर्भात नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:40 PM2020-02-24T13:40:30+5:302020-02-24T13:40:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पथराई विद्यालयातील शिक्षकांना मारहाण प्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी धमडार्ई, ता.नंदुरबार येथील आवडामाई शैक्षणिक व ...

Notice regarding cancellation of school | शाळेची मान्यता रद्द करण्यासंदर्भात नोटीस

शाळेची मान्यता रद्द करण्यासंदर्भात नोटीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पथराई विद्यालयातील शिक्षकांना मारहाण प्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी धमडार्ई, ता.नंदुरबार येथील आवडामाई शैक्षणिक व सास्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांना नोटीस बजावली आहे. संस्थाचालकांच्या फूसवरूनच शिक्षकांना शाळेत जावून जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना गेल्या मंगळवारी घडली होती. याबाबत सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानंतरच या घटनेची वाच्यता झाली होती.
शैक्षणिक वर्तूळात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेची शिक्षण विभागाने दखल घेतली असून आतातरी पोलिसात गुन्हा दाखल केला जातो की नाही याबाबत शिक्षण संस्था चालकांच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम यांनी २१ फेब्रुवारी रोजी संस्थेला आणि मुख्याध्यापकांना याबाबत बजावलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, आवडामाई शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धमडाई संचलित माध्यमिक विद्यालय पथराई येथे शिक्षकांना मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मारहाण प्रकरणी शिक्षकांची कोणत्याही प्रकारची चूक नसून एका सूड भावनेने हा प्रकार घडून आल्याचे स्पष्ट होते.
ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी शाळेत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसमोर ही घटना घडली. मुख्याध्यापकांनी घटना निदर्शनास आल्यानंतर मध्यस्थी का केली नाही. झालेला वाद हा मिटविला का नाही? याबाबत पोलिसात कुठलीही तक्रार का दिली गेली नाही? या बाबी संसयास्पद आहेत.
झालेला प्रकार हा अत्यंत निंदनीय असून याबाबत जिल्ह्यात व जिल्हाबाहेर शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार शिक्षणासारख्या पवीत्र क्षेत्राला काळीमा फासणारा आहे. संस्थेने याबाबत कोणती कारवाई केली हे स्पष्ट करावे. या गंभीर घटनेला संस्थाचालक दोषी ठरवून शाळेची मान्यता का काढण्यात येवू नये आदी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
संस्थेवर प्रशासक बसविण्याबाबत शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडे शिफारस करून प्रस्ताव का सादर करण्यात येवू नये याबाबत तातडीने खुलासा करावा. समक्ष कार्यालयात येवून याबाबत स्पष्टीकरण द्यावे असेही या नोटीसीत नमुद करण्यात आले आहे.
शिक्षणाधिकारी यांनी घेतलेल्या कडक भुमिकेमुळे शिक्षण क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात असून यापुढे असे प्रकार घडणार नाहीत यासाठी संस्थेला व संबधितांना कठोर शिक्षा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घटनेचा जिल्ह्यात सर्वच स्थरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

४एवढी मोठी घटना घडून, त्यात चार शिक्षक जखमी होऊन देखील शाळा किंवा संस्थेतर्फे कुठलीही तक्रार करण्यात आलेली नाही, पोलिसांकडे साधा तक्रारी अर्जही दिला गेला नाही.
४गुंड प्रवृत्तीचा जमाव शाळेत येतो, विद्यार्थी, शिक्षकांसमोर ठराविक शिक्षकांनाच मारहाण करतो, विद्यार्थीनी शिक्षकांची बाजू घेत असतांनाही मुख्याध्यापक किंवा अन्य कुणी मध्यस्थी करीत नाही या सर्वच गोष्टी संशायस्पद आहेत. घटना घडवून आणण्यामागचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Notice regarding cancellation of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.