गेल्या आठवड्यात रवींद्र पटेल यांच्या मालकीच्या म्हशीच्या प्रसूतीसाठी सुमुल डेअरीचे पशुवैद्यकीय डाॅ. अविनाश पाटील यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांच्याकडून गुंतागुतीची प्रसूतीची प्रक्रिया अगदी सुखरूपपणे पार पाडण्यात आली. बाहेर आलेल्या दुतोंडी पारडूला पाहून पशुपालकासह गावातील नागरिकांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. अल्पावधीतच ही माहिती बाहेरगावी पसरल्याने नागरिक भेट देऊन माहिती घेत आहेत. डाॅ. पाटील यांना डेअरीचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
निझर येथील अशा आश्चर्यकारक घटनेमुळे परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी होतं आहे, श्रावण महिन्यात दोन तोंडी पारडू जन्माला आल्याने अनेकांनी नवस बोलून पारडूचे पूजन केले. दरम्यान, दोन तोंडे असलेल्या पारडूची प्रकृती बरी असल्याचे सांगण्यात आले आहे.
डॉ. अविनाश पटेल यांना यावेळी संपर्क केला असता, लाखातून अशी एखादी घटना घडू शकते. यापूर्वी या परिसरात दुतोंडी पारडू जन्माला आलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.