शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

९६ हजारपैकी नऊ हजार मे. टन खत साठा प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यात रासायनिक खतांचा समाधानकारक पुरवठा करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी खतांचा अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन कृषी ...

नंदुरबार : जिल्ह्यात रासायनिक खतांचा समाधानकारक पुरवठा करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी खतांचा अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्याला खरीप २०२१ हंगामाकरिता एकूण ९६ हजार २० मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन करण्यात आलेले आहे. १० मेपर्यंत त्यापैकी ८७८० मेट्रिक टन रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खताच्या एकाच ग्रेडचा आग्रह न धरता, उपलब्ध असलेल्या खतांमधून आपली गरज भागवावी आणि आवश्यक तेवढेच खत खरेदी करावे. खतांचा तुटवडा जाणवू नये, यासाठी अनावश्यक साठा करू नये. खरीप हंगामात मंजूर आवंटनानुसार टप्प्याटप्प्याने पुरेसे खत उपलब्ध होईल. पिकांना फक्त युरिया खताची आवश्यकता नसून, इतरही घटक पीक व उत्पादन वाढीसाठी आवश्यक असल्याने युरियासोबत कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या रासायनिक खतांचा प्रमाणात वापर करावा. खत खरेदी करताना आधारकार्ड सोबत न्यावे.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४५ हजार ५९० मेट्रिक टन युरियाचे आवंटन असून, चार हजार ६१ मेट्रिक टन प्राप्त झाले आहे. एमओपी ९ हजार ८६०पैकी ५१८ मेट्रिक टन, एसएसपी १७ हजार ३००पैकी २ हजार ९८४ मेट्रिक टन, एनपीके १६ हजार ३९० मेट्रिक टन आवंटन असून, त्यापैकी १ हजार २१२ मेट्रिक टन पुरवठा झाला आहे. डीएपीचे ६ हजार ८८० मेट्रिक टन आवंटन असून, अद्याप पुरवठा झालेला नाही, अशी माहिती कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, नंदुरबार यांनी दिली आहे.