लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील १५ राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांची पीक कर्ज वाटपाची गाडी अद्यापही अडखळत सुरू आहे़ जुलै मध्य येऊनही बँकांनी केवळ १९ टक्केच पीक कर्ज वाटप केले असून शेतकरी सातत्याने पीक कर्जाची मागणी करूनही अनेकांना कर्ज मिळालेले नाही़बुधवारी जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाने कृषी कर्जमुक्ती योजनेंतर्गत १४ हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ९९ कोटी रूपयांचा निधी वर्ग केला आहे़ यामुळे सर्व १४ हजार शेतकºयांची नवीन पीक कर्ज घेण्याची वाट मोकळी झाली आहे़ यात सर्वाधिक १० हजार शेतकरी हे जिल्हा बँकेचे तर उर्वरित ३ हजार ८०० शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांचे खातेदार आहेत़ या शेतकºयांना नव्याने पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ मात्र जिल्हा बँक वगळता जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका कर्ज वाटपात पूर्णपणे ढेपाळल्या असल्याचे चित्र आहे़ खरीप पेरण्या सुरू होवून पूर्ण होण्यावर येत असतानाही आजअखेरीस केवळ १० हजार शेतकºयांना पीक कर्ज देण्यात सर्व १५ खाजगी आणि राष्ट्रीयकृत बँकांना यश आले आहे़ सर्व बँकांनी मिळून १४३ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केल्याची माहिती आहे़ यात एकट्या जिल्हा बँकेचा वाटा हा ४५ टक्के आहे़दरम्यान राष्ट्रीयकृत बँकांकडून नवीन पीक कर्जासाठी लागणाºया नो-ड्यूज प्रमाणपत्रासाठी शेतकºयांची फिरवाफिरव सुरू असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत़ सर्व कागदपत्रे देऊनही बँका लक्ष देत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत ५ हजार १०८ शेतकरी आणि २२७ विकासो संस्था यांना ४४ कोटी १७ लाख रुपयांचे कर्ज आतापर्यंत वाटप केले आहे़ यामुळे ७ हजार ३६३ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे़ बँकांच्या १० हजार ११८ शेतकºयांचे ६५ कोटी रूपयांचे कर्ज माफ झाले आहे़ यातून या शेतकºयांना पुन्हा नव्याने कर्ज मिळणार असल्याने कर्जाचा आकडा वाढणार आहे़राष्ट्रीयकृत बँकांकडे नव्याने कर्ज मागणाºया शेतकºयांना ३० वर्षांचे खातेउतारे आणि सर्व बँकांमधून नोड्यूज प्रमाणपत्र आणण्याची सक्ती होत असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे़आठ राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ ४ हजार ८२६ शेतकºयांना ७९ कोटी ३७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे़ यात बँक आॅफ बडोदाने १ हजार ८७, बँक आॅफ इंडिया ३०९, बँक आॅफ महाराष्ट्र ८०२, कॅनरा बँक ४४, सेंट्रल बँक आॅफ इंडिया १ हजार ३८३, पंजाब नॅशनल बँक ४२, युनियन बँक ५६७ तर स्टेट बँक आॅफ इंडियाने ५९२ शेतकºयांना कर्ज दिले आहे़४जिल्ह्यातील चार खाजगी बँकांनी ५५१ शेतकºयांना १७ कोटी २२ लाख रुपयांचे तर ग्रामीण बँकेने २२४ शेतकºयांना २ कोटी रुपयांपर्यंत कर्ज वाटप केले आहे़
राष्ट्रीयकृतसह खाजगी आणि सहकारी बँकांनी दिले १० हजार शेतकऱ्यांना पीककर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:40 IST