शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट, मनसेची माघार, अभिजित पानसे भरणार नाहीत उमेदवारी अर्ज 
2
"कान उघडून ऐका..., 27 चा ट्रेलर ठीक नसेल"! अयोध्येतील भाजप पराभवावर हे काय बोलून गेले महंत राजूदास?
3
आजचे राशीभविष्य: व्यापारवृद्धी, अचानक धनलाभाचे योग; कामात यश, उत्साहवर्धक दिवस
4
मनोज जरांगेंना मोठा धक्का! उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली; ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल
5
एनडीएतील घटक पक्षांना हवी आहेत लोकसभाध्यक्षपदासह मलईदार खाती
6
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून; मंत्रिमंडळाने राज्यपालांना केली शिफारस
7
धक्कादायक! मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरात चोरी, १० तोळं सोनं लंपास
8
Blinkit च्या गोदामात अन्न सुरक्षेशी तडजोड! छाप्यात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित
9
ईएमआय वाढणार की घटणार? आज निर्णय, RBI जाहीर करणार पतधोरण
10
बिहारमध्ये पेपरफुटी, महाराष्ट्राच्या पालकांमध्ये तीव्र संताप, नीट युजीची विश्वासार्हता धोक्यात
11
राज्यातील १५ खासदार वयाची साठी ओलांडलेले; चाळिशीच्या आतील केवळ सहा!
12
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : निकालानंतर सुंदाेपसुंदी, भाजपच्या सर्व्हेवर शिंदेसेनेची नाराजी; अजित पवारांच्या बैठकीस आमदारांची दांडी
13
Lok Sabha Election Result 2024 : सर्व १२१ अशिक्षित उमेदवारांना नाकारले, तुमच्या खासदाराचे शिक्षण किती?
14
निवडणूक यंत्रणा नि:पक्षपाती हे निकालानेच सिद्ध केले : एस. चोकलिंगम
15
पाठिंब्याच्या मोबदल्यात जदयुचे भाजपवर दबावाचे राजकारण
16
मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा, देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थांच्या यादीत समावेश
17
इतर राज्यांमध्येही चालली छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांची जादू
18
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : ‘वंचित’ला तब्बल ८ मतदारसंघांमध्ये विजयी मताधिक्यापेक्षाही जास्त मते
19
Lok Sabha Election Result 2024 : ६ राज्यांत काँग्रेसच्या पराभवामुळे सत्ता मिळवण्यात ‘इंडिया’ला अपयश
20
देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, राजीनाम्याच्या मुद्द्यावर करणार चर्चा

नंदुरबारातील स्मार्टकार्ड वितरण दीड महिन्यापासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:06 PM

एजन्सी चालकाची मनमानी : आरटीओ अधिकारीही हतबल, वाहनमालक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आरटीओ कार्यालय आणि स्मार्ट कार्ड देणारी एजन्सी यांच्यातील समन्वयाअभावी गेल्या दीड महिन्यांपासून वाहनमालक त्रस्त झाले आहेत. स्मार्ट कार्ड देण्याच्या नावाखाली दोन महिन्यांपासून वाहन मालकांना फिरवाफिरव केली जात आहे. आरटीओ अधिका:यांचा संबधीत एजन्सीचालकावर वचकच राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयांमधून 28 डिसेंबरपासून वाहनमालकांना स्मार्टकार्ड देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार यासंदर्भात काम दिलेल्या एजन्सीने राज्यातील काही जिल्ह्यात ते काम सुरू देखील केले आहे. परंतु नंदुरबार आरटीओ कार्यालयात केवळ वीज जोडणीच्या कारणामुळे ते सुरू होऊ शकलेले नाही. परिणामी दोन महिन्यांपासून वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे संबधीत एजन्सीच्या मनमानीपुढे आरटीओ अधिकारी देखील हतबल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.मनमानी कायमराज्यस्तरावरून ज्या एजन्सीला याबाबतचे काम देण्यात आले आहे त्या कंपनीने नंदुरबारात मनमानी चालविली आहे. या कामासाठी लागणारी मशिनरी आणि इतर साहित्य येवून पडले आहे. केवळ वीज जोडणीची समस्या आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार आरटीओ कार्यालयाने वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी. परंतु वीज जोडणीचे काम एजन्सीचालकाचे असल्याचे सांगून आरटीओ अधिकारी हात वर करीत आहेत. यामुळे स्मार्ट कार्ड वितरणच अद्यापर्पयत होऊ शकले नसल्याचे चित्र येथील कार्यालयात आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी देखील याकडे दुर्लक्षच केले असल्याचे दिसून येत आहे.वाहनमालक हैराणया जाचामुळे वाहनमालक हैराण झाले आहेत. ज्यांनी स्मार्टकार्डसाठी 25 डिसेंबरपासून कागदपत्रे जमा केली आहेत त्यांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागत आहे. नवीन वाहनांची नोंदणीप्रमाणेच जुनी वाहने हस्तांतरीत करणे, त्यांच्यावरील कर्ज प्रक्रिया, विक्रीची कागदपत्रे ही सर्व या कारणामुळे अडून पडली आहेत. 1 जानेवारीपासून वाहनमालक आरटीओ कार्यालयाच्या चकरा मारत आहेत परंतु त्यांना योग्य उत्तर मिळत नाही, शिवाय कामही होत नसल्यामुळे    हैराण व्हावे लागत आहे. लांब अंतरावरून आलेल्या वाहनमालकांना खाली हात जावे लागत असल्यामुळे प्रचंड संताप देखील व्यक्त केला जात आहे.जुन्या पद्धतीचा वापर व्हावास्मार्टकार्ड वितरण प्रणाली जेंव्हा सुरू व्हायची असेल तेंव्हा होईल. परंतु सध्या जुन्या पद्धतीचाच वापर करून वाहनचालकांना कागदपत्रे द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत काही वाहनचालक व एजंट यांनी अधिका:यांकडे तशी मागणी देखील केली. परंतु शासन आदेशानुसारच काम करावे लागेल असे सांगून त्यांचीही बोळवण या अधिका:यांनी केली.जबाबदारी कुणाचीस्मार्टकार्ड वितरण प्रणाली चालविणा:या एजन्सीला वीज जोडणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नेमकी आरटीओ कार्यालयाची आहे किंवा कसे याबाबत संदिग्धता कायम आहे. आरटीओ अधिकारी केवळ त्यांना वीज जोडणीसाठी सहकार्य करू शकतात. बाकी प्रक्रिया त्यांनी स्वत: राबविणे आवश्यक आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात देखील त्याच पद्धतीने या एजन्सीने वीज पुरवठा घेतलेला आहे.