नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाकडून दसरा, दिवाळी सणांनिमित्त हंगामी स्वरुपाची भाडेवाढ करण्यात येणार आह़े याचा नंदुरबारकरांना मोठा फटका बसणार आह़े त्यामुळे प्रवाशांकडून महामंडळाच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े एसटी महामंडळाकडून 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान एसटीच्या दरात हंगामी भाडेवाढ करण्याचे नियोजन आखले जात आह़े त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवास देखील परवडणार नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े सध्याचे भाढे व अंदाजीत वाढ (10 टक्के भाडेवाढ झाल्यास)नंदुरबार-धुळे सध्या 120 रुपये तर अंदाजीत भाडेवाढीनंतर 132 रुपये, धुळे-जळगाव 120 रुपये तर भाडेवाढीनंतर 132 रुपये, नंदुरबार-औरंगाबाद 320 भाडेवाढीनंतर 335, नंदुरबार-नाशिक 330 तर भाडेवाढीनंतर 342, नंदुरबार-मुंबई 605 तर भाडेवाढीनंतर 617, नंदुरबार-सूरत 180 रुपये तर भाडेवाढीनंतर 192, नंदुरबार-मालेगाव 200 रुपये तर भाडेवाढीनंतर 212 रुपये इतकी भाडेवाढ होण्याची शक्यता आह़े
नंदुरबारकरांना एसटी दरवाढीचा बसणार फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:17 IST