शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar: लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड मारून केला खून

By मनोज शेलार | Updated: August 26, 2023 19:23 IST

Nandurbar Crime News: पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. तुझ्यामुळे त्रास होत असल्याचे सांगितल्याचा राग येऊन लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना वागदी, ता.नवापूर येथे शुक्रवारी रात्री उशिरा घडली.

- मनोज शेलार नंदुरबार - पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. तुझ्यामुळे त्रास होत असल्याचे सांगितल्याचा राग येऊन लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना वागदी, ता.नवापूर येथे शुक्रवारी रात्री उशिरा घडली. या घटनेत वहिनीच्याही डोक्यात कुऱ्हाडीने वार करून, तिलाही गंभीर जखमी करण्यात आले आहे.

घटनेनंतर संशयित फरार झाला आहे. विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. नरेश रवसू वळवी (३९) असे मयताचे नाव आहे, तर सरिता वळवी (३४) असे जखमी महिलेचे नाव आहे. संशयित विश्वास रवसू वळवी (३४) हा फरार झाला आहे. विश्वास याने गावातील एका महिलेस मारहाण केल्याने, दोघा भावांवर गुन्हा दाखल होऊन न्यायालयात खटला चालू आहे. शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी रात्री संशयित विश्वास वळवी हा त्याचा मोठा भाऊ नरेश वळवी याच्या घरी आला. दोघांमध्ये चर्चा सुरू असताना नरेश याने, तुझ्यामुळे न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याचे सांगितले.

त्यामुळे विश्वास याला त्याचा राग आला. त्याने घरातील कुऱ्हाड काढून नरेश याच्या डोक्यावर वार केले. त्यात तो जागीच ठार झाला, तर नरेशची पत्नी सरीता वाचविण्यास गेली असता, तिच्या डोक्यातही कुऱ्हाड टाकल्याने तीही जखमी झाली. महिलेस विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

याबाबत विसरवाडी पोलिस ठाण्यात सरीता नरेश वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवर संशयित विश्वास रवसू वळवी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे करीत आहेत. संशयित विश्वास वळवी हा या घटनेनंतर फरार झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी