पुणे येथे ३१ जानेवारी रोजी राज्यस्तरीय मुला-मुलींच्या क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणीत राज्य संघटनेने प्रमाणित केलेल्या १६ वर्षाखालील मुले व मुली दोन किलोमीटर, १८ वर्षाखालील मुली चार किलोमीटर आणि मुले सहा किलोमीटर, २० वर्षाखालील मुली सहा किलोमीटर आणि मुले आठ किलोमीटर तसेच खुल्या वयोगटातील पुरुष आणि महिलांसाठी १० किलोमीटर धावण्यासाठी निवड चाचणी होणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयोगट- जन्मतारखेची पात्रता, १६ वर्ष वयोगट मुले व मुली २२ फेब्रुवारी २००५ ते २१ फेब्रुवारी २००७ दरम्यान, १८ वर्ष वयोगट मुले-मुली २२ फेब्रुवारी २००३ ते २१ फेब्रुवारी २००५ दरम्यान तसेच २० वर्ष वयोगटासाठी २२ फेब्रुवारी २००१ ते २१ फेब्रुवारी २००३ दरम्यान जन्म असावा. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी १४ वर्षाखालील ॲथलीट सहभागी होण्यासाठी पात्र ठरणार नाहीत. खेळाडूंनी २५ जानेवारी २०२१ सकाळी साडेसात वाजता आपल्या जन्माचा दाखला, आधार कार्ड घेऊन निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी, सचिव प्रा. दिलीप जानराव, स्पर्धा प्रमुख प्रा. डॉ. मयूर ठाकरे यांनी केले आहे.
राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी सोमवारी नंदुरबार निवड चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:14 IST