लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धुळ्याकडून नंदुरबारात अवैध गुटखा आणतांना एकास पोलीस व अन्न सुरक्षा विभागाने वाघेश्वरी चौफुलीवर रंगेहात पकडले. त्याच्याकडून 92 हजार 400 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. प्रवीण भिकन भामरे (42) रा.अप्पु गल्ली, चाळीसगाव असे संशयीताचे नाव आहे. शासनाने बंदी घातलेला गुटखा घेवून तो नंदुरबारात विक्रीसाठी आणत होता. नंदुरबारातील वाघेश्वरी चौफुलीवर त्याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याजवळील सामानाची तपासणी केली असता एकुण 92 हजार 400 रुपये किंमतीचा गुटखा आढळला. याबाबत जिल्हा अन्न सुरक्षा अधिकारी दिनेश ज्ञानेश्वर तांबोळी यांनी फिर्याद दिल्याने प्रवीण भामरे याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा कायदा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक नंदवाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास फौजदार बि:हाडे करीत आहे.
नंदुरबारात 92 हजारांचा गुटखा जप्त, एकजण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 12:06 IST