शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar: जळगाव-उधना दरम्यान तिसरा रेल्वेमार्गसाठी प्रयत्न, रावसाहेब दानवेंचं आश्वासन

By मनोज शेलार | Updated: August 19, 2023 19:20 IST

Indian Railway: उधना-जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम उत्कृष्ट झाले. आता तिसरी लाइन टाकण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. शिवाय अमृत भारत रेल्वेस्थानकांतर्गत खान्देशातील आणखी काही स्थानकांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नंदुरबारात पत्रकारांशी बोलतांना केले.

- मनोज शेलार नंदुरबार - उधना-जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम उत्कृष्ट झाले. आता तिसरी लाइन टाकण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. शिवाय अमृत भारत रेल्वेस्थानकांतर्गत खान्देशातील आणखी काही स्थानकांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नंदुरबारात पत्रकारांशी बोलतांना केले. भुसावळ-सुरत मार्गावरील कामांच्या पाहणीसाठी दानवे हे विशेष रेल्वेने जात असताना नंदुरबारात काही काळ थांबले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, पश्चिम रेल्वेच्या ताप्ती सेक्शनवरील उधना-जळगाव हे रेल्वेलाइन महत्त्वपूर्ण आहे. दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर आता तिसरी लाइन बाबत विचार सुरू आहे.

सर्व आवश्यक यंत्रणांचा अहवाल मागवून हा निर्णय घेतला जाईल. अमृत स्थानकांतर्गत पहिल्या टप्प्यात मोजक्याच स्थानकांचा सहभाग आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील विशेषत: खान्देशातील जास्तीत जास्त स्थानके घेण्याचा प्रयत्न असेल. मोदी सरकार आल्यापासून रेल्वेचे बजेट मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याने मागे पडलेल्या कामांना गती देण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली पाचोरा-जामनेर मार्गांवर नवीन रेल्वेमार्ग टाकणार आहे. त्यासोबतच कोल्हापूर ते तुळजापूर, नगरपासून ते बीड-परळीपर्यंत या मार्गांच्या कामांना गती देणार आहोत.

वंदे भारत रेल्वे आतापर्यंत २५ सुरू झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसचा कलर बदलण्यात आला असून, हा कलर महत्त्वाच्या नाही. आता सिटिंगसह स्लिपर कोचदेखील तयार केले जाणार आहेत. लातूर येथे कोच बांधणीची फॅक्टरी सुरू करत असून, त्या ठिकाणी स्लीपर कोचेस तयार केले जाणार आहेत. १०० ट्रेन बनविण्याच्या प्रस्ताव रेल्वे विभागाने दिलेला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेJalgaonजळगावraosaheb danveरावसाहेब दानवे