शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar: दुर्गम भागात गाढवे पूर्ण करताहेत घरकुलांचे स्वप्न पूर्ण

By भूषण.विजय.रामराजे | Updated: April 12, 2023 18:53 IST

Nandurbar: तळोदा तालुक्यातील रापापूर ते कुयलीडाबर अशा आठ किलोमीटर दरम्यान रस्ता नसल्याने ग्रामस्थांना आजही तालुका मुख्यालयापर्यंत येण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

- भूषण रामराजे  नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रापापूर ते कुयलीडाबर अशा आठ किलोमीटर दरम्यान रस्ता नसल्याने ग्रामस्थांना आजही तालुका मुख्यालयापर्यंत येण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. रस्ता नसला तरी या गावांना शासनाच्या काही योजना मात्र पोहोचल्या आहेत. यातील घरकुल योजनेचा लाभ घेणे ग्रामस्थांसाठी अत्यंत तापदायी ठरत असून घर बांधकामासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी गाढवांचा वापर करून पक्क्या घरांचे स्वप्न ग्रामस्थ पूर्ण करत आहेत.

सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या केलवापाणी, पालाबार, कुवलीडाबर या गावांच्या समस्या सर्वश्रुत आहेत. पिण्याचे पाणी, वीज आणि पक्का रस्ता यांची प्रतीक्षा असलेल्या येथील ग्रामस्थांची सर्वच स्तरातून आश्वासने देत बोळवण केले जात असताना शासनाच्या काही योजनांचा मात्र लाभ मिळत आहे. यातील घरकुल योजनेच्या याद्यांमधील लाभार्थीही येथे आहेत. योजना मंजूर झाल्यानंतर घर बांधणे मात्र या ग्रामस्थांसाठी स्वप्नवत ठरत आहे. रस्ता नसल्याने वाळू, सिमेंट, लोखंड हे साहित्य तळोद्यातून खरेदी होत असले तरीही ते प्रत्यक्षात घरापर्यंत आणण्यासाठी मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

रापापूरपर्यंत खरेदी करून आणलेले साहित्य तेथून गाढवांच्या पाठीवर लादून घरापर्यंत पोहोचत आहे. परंतु, यासाठी चारचाकी वाहनापेक्षा तीनपट अधिक खर्च करावा लागत असल्याने अनेकांचे आर्थिक गणित चुकून घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.आदिवासी लाभार्थींच्या म्हणण्यानुसार वाळू, खडी आणि सिमेंट आणण्यासाठी लागणारा गाढवांचा खर्च हा चारचाकी वाहनाच्या वाहतुकीपेक्षा तीनपट अधिक आहे. गाढव मालक वाढीव पैसे घेत असल्याने आर्थिक बोजा वाढत आहे.

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजन