Vidhan Sabha 2019 : नंदुरबार जिल्ह्यात मतदान जागृतीसाठी पथनाटय़ासह विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:38 PM2019-10-13T12:38:11+5:302019-10-13T12:38:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यात मतदान जागृती आणि दिव्यांग मतदारांना देण्यात येणा:या सुविधांची माहिती जनतेपयर्ंत पोहोचविण्यासाठी स्वीप अंतर्गत ...

Nandurbar district with various programs for voter awareness campaign | Vidhan Sabha 2019 : नंदुरबार जिल्ह्यात मतदान जागृतीसाठी पथनाटय़ासह विविध उपक्रम

Vidhan Sabha 2019 : नंदुरबार जिल्ह्यात मतदान जागृतीसाठी पथनाटय़ासह विविध उपक्रम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  जिल्ह्यात मतदान जागृती आणि दिव्यांग मतदारांना देण्यात येणा:या सुविधांची माहिती जनतेपयर्ंत पोहोचविण्यासाठी स्वीप अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयांसह सामाजिक संस्थांनीदेखील यात सहभाग घेतला आहे.
जिल्हा परिषद आणि आश्रमशाळेच्या विद्याथ्र्यांनी मतदार जनजागृती रॅलीद्वारे मतदानाचे आवाहन केले. शाळांमधून चित्रकला आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करून मतदानाचा संदेश देण्यात आला. शाळकरी विद्याथ्र्यांनी सुंदर कलेच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.
विद्याथ्र्यांनी अनेक ठिकाणी अभिनव कल्पनेतून मतदानाचे संदेश साकारले. धडगाव-अक्राणी सारख्या दुर्गम भागातदेखील या उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दिव्यांग मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यासाठीदेखील रॅलीचे आयोजन करण्यात आले. शाळेतील शिक्षकदेखील उपक्रमात उत्स्फुर्तपणे सहभागी होत असल्याने हा उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक भागात पोहोचला आहे.
युवारंग फाऊंडेशन कलापथकाद्वारे पथनाटय़ाच्या माध्यमातून मतदानाचा संदेश देण्यात येत आहे. या पथकाद्वारे मतदासाठी प्रशासनाने केलेल्या सुविधांची माहिती देण्याबरोबर कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील चारही मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकांचे सार्वजनिक ठिकाणी आणि तहसील कार्यालयात प्रात्यक्षिक आयोजित करून नागरिकांना ईव्हीएम यंत्राबाबत माहिती करून देण्यात येत आहे. मतदान प्रक्रीया समजून घेण्यासाठी ही प्रात्यक्षिके उपयुक्त ठरत आहेत.
नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी मतदान जागृती उपक्रमात सहभाग घ्यावा आणि जिल्ह्याला मतदानाच्या टक्केवारीत प्रथम आणण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

Web Title: Nandurbar district with various programs for voter awareness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.