लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बौद्ध सांस्कृतिक समता मंडळाची जमीन परस्पर खरेदी व विक्री केल्याप्रकरणी 20 जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबारातील सव्र्हे नंबर 250 मधील 38 आर जमीन ही बौद्ध सांस्कृतिक समता मंडळाच्या नावावर आहे. परंतु ही जमीन धर्मदाय आयुक्त यांची परवाणगी न घेता परस्पर विक्री व खरेदी केल्याचा आरोप विजय रोहिदास जाधव, रा.निझर यांनी केला. आहे. तशी फिर्याद देखील त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून विनोद संभाजी नांदेडकर, रमण जंगा साळवे, शेखर वसंत पवार, लोटन श्रीपत थोरात, सोनल किरण अहिरे, प्रकाश विक्रम साळवे, अजय जयसिंग पाटील, अबरार कौसर धोबी, जाकीर जाबीर बागवान, शाकीर शेख जाबीर बागवान, रशिद इब्राहिम बागवान, वसिम इकबाल धोबी, शेख गफ्फार शेख हनीफ, शेख अल्ताफ शेख महमंद, मेमन वकार अहमद, फरजानाबानो मेमन, आयेशा सिद्दीकी एम हारून मेमन, फरजाना अशर लोहिया, अशर मशाभाई लोहिया, तरसूनबानो मेमन, सर्व रा.नंदुरबार यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक दिवटे करीत आहे.
जमीन परस्पर विक्री, 20 जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 13:00 IST