अनैतिक संबधांच्या संशयातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 12:39 PM2020-04-01T12:39:09+5:302020-04-01T12:39:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लक्कडकोट ता़ नवापुर येथील पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयातून एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी ...

Murder from suspicion of immoral relations | अनैतिक संबधांच्या संशयातून खून

अनैतिक संबधांच्या संशयातून खून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लक्कडकोट ता़ नवापुर येथील पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयातून एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी संशयित पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली़
सुभाष रुपसिंग गावीत (५०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे़ मयत सुभाष याचे पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याचा संशय अमृत बाबू गावीत यास होता़ यातून अमृत गावीत याने सोमवारी सायंकाळी सुभाष गावीत यांच्यासोबत घरासमोर वाद घालण्यास सुरुवात केली़ यादरम्यान संशयित अमृत याने त्याच्याजवळ असलेल्या कुºहाडीने सुभाष गावीत यांच्या डोक्यात वार केला़ यातून गंभीर ंइजा झाल्याने सुभाष गावीत हे जागीच ठार झाले़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक डी़एस़शिंपी यांनी तातडीने लक्कडकोट वडफळी येथे भेट देत माहिती जाणून घेतली़
याबाबत रात्री उशिरा मारथाबाई सुभाष गावीत यांनी नवापुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित अमृत गावीत याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला़ मंगळवारी पहाटे अमृत गावीत यास अटक करण्यात आली़

Web Title: Murder from suspicion of immoral relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.