शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

नर्मदा आंदोलकांचे मणिबेली येथे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 11:42 IST

सरदार सरोवर लोकार्पणास विरोध : पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळा बुडविला पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रविवारी सकाळी मणिबेली येथे सरदार सरोवर प्रकल्पबाधितांनी प्रातिनिधीक स्वरूपात एकत्र येऊन सरदार सरोवर धरणाच्या लोकार्पणाच्या सोहळ्याला विरोध केला.  सरदार सरोवर धरणामुळे बुडितात आलेल्या महाराष्ट्राच्या 33 गावातील सर्व गाव प्रतिनिधींनी नर्मदा आंदोलनाच्या नेतृत्त्वाखाली सकाळी एकत्र आले. प्रकल्पात बुडालेले महाराष्ट्रातील पहिले गाव मणिबेली येथे पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळा बनवून जोरदार घोषणा देत बोट सरदार सरोवर धरणाकडे काढली.महाराष्ट्रातील जवळपास 100 घोषित कुटुंबांना जमीन मिळणे बाकी आहे. टापू सव्र्हेक्षणाच्या वेळी बुडितात आढळून आलेल्या 226 अघोषित कुटुंबांना घोषिताची प्रक्रिया अपुर्ण आहे. भुसंपादन बाकी असताना बुडविणे, जवळपास 300 कुटुंबांचे स्थलांतर बाकी असणे, तीन पूर्ण पुनर्वसन वसाहतींचे निर्माण व एक अर्धी वसाहतीचे काम बाकी आहे. मुळ गाव व पुनर्वसन वसाहतींना मूलभूत नागरी सोयीसुविधा देण्याचे बाकी आहे. असे असतांना धरणाचे गेट बंद बंद करण्यात आले. पुनर्वसन बाकी असताना धरणाच्या लोकार्पणाचा सोहळा सरदार सरोवर निगम लिमिटेडकडून 80 लाख रुपये खर्च करून करणे हे अन्यायपुर्ण असल्याचे नर्मदा आंदोलकांतर्फे सांगण्यात आले.  आदिवासींना पाचव्या अनुसूचित विशेष अधिकार दिले आहेत. पेसाचा कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात आहे.  नर्मदा पाणी तंटा लवाद आहे, महाराष्ट्र शासनाने घेतलेले निर्णय व शासन निर्णय आहेत ज्यामध्ये आधी पुनर्वसन मग धरण असे स्पष्ट धोरण असताना सर्व कायदे धाब्यावर बसवून एकतर्फी निर्णय घेतला जात आहे. पुनर्वसन बाकी असताना धरणाचे लोकार्पण करणे हे म्हणजे प्रकल्पबाधितांची आदिवासींची थट्टा असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त नुरजी पाडवी यांनी केला.सर्व प्रकल्पबाधितांनी नर्मदा बचाओ, मानव बचाओ, रहने दो हमे जीने दो मा नर्मदा को बहने दो, नर्मदा घाटी का एकही नारा, नही छोडेंगे नर्मदा किनारा,.. आदी नारे देत या लोकार्पणाच्या सोहळ्याचा निषेध करत प्रकल्पात व मणिबेली गावाच्या मध्यभागी मोदींचा पुतळा पाण्यात बुडवून विरोध दर्शविला.विकासाच्या नावावर सातत्याने होणारे विस्थापन व डूब याला नर्मदेचे प्रकल्पबाधित पुन्हा एकदा सामोरे जातील व पुनर्वसन पूर्ण होईर्पयत संघर्ष सुरू ठेवत पाण्याशी टक्कर देतील, असा इशाराही या वेळी प्रकल्प बाधितांनी व नर्मदा बचाओ आंदोलनाने दिला.