शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

10 वर्षात निम्म्यावर आला पावसाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 11:46 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जूननंतर मान्सूनच्या सरींवर अवलंबून असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात कधीकाळी जून ते ऑक्टोबर ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जूननंतर मान्सूनच्या सरींवर अवलंबून असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात कधीकाळी जून ते ऑक्टोबर असा पाच महिन्यांचा कालखंड पावसाळा म्हणून गणला जाई़ परंतू गेल्या 10 वर्षात  जिल्ह्यात सरासरी 60 दिवस पाऊस होत असून यामुळे येथील सर्वच घटकांवर प्रभाव पडून पर्यावरणाला धोका निर्माण होत आह़े  जून, जुलै ते सप्टेंबर आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर अखेर अशी पावसाची मोजणी केली जात़े साधारण 90 ते 120 दिवस पाऊस राज्यातील विविध भागात कोसळत असताना नंदुरबार जिल्ह्यात मात्र गत 5 वर्ष 38 ते 58 दिवस पाऊस कोसळला आह़े या पावसामुळे भूजल पातळी, जलप्रकल्प, शेती यांना सर्वाधिक फटका बसून येथील नागरिक जलसंकटास सामोरे जात आहेत़ 2005 नंतर कमी अधिक प्रमाणात कोसळलेल्या पावसाची सरासरी वाढवण्यासाठी वृक्ष लागवड, जलयुक्त सारखे उपक्रम राबवले असले तरी त्यातून पाऊस मात्र वाढला नाही़ जिल्ह्यात तीनच तालुक्यात 2015 नंतर 60 मिलीमीटरपेक्षा अधिक अशा पाऊस फक्त सरासरी चार दिवस कोसळला आह़े2018 हे वर्ष पावसाच्या दृष्टीने सर्वाधिक भीषण असे वर्ष ठरले आह़े या वर्षात केवळ 48 दिवस पाऊस झाला होता़ तर तब्बल 78 दिवस हे कोरडे होत़े दिवसाला सर्वसाधारण 2़5 मिलीमीटर पाऊसही या कोरडय़ा दिवसात झालेला नव्हता़ यात सर्वाधिक विशेष बाब म्हणून 18 ऑगस्ट रोजी नवापूर तालुक्यात 144़2, धडगाव तालुक्यात 68़8, 21 जुलै रोजी अक्कलकुवा तालुक्यात 74 मिलीमीटर पावसाची नोंद आह़े याव्यतिरिक्त अक्कलकुवा तालुक्यात 22 मार्च रोजी 115 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आह़े 2018 या वर्षात केवळ चारच दिवस 65 मिलीमीटरपेक्षा अधिक असा मुसळधार पाऊस झाला होता़ जून ते सप्टेंबर यादरम्यान घेतल्या गेलेल्या नोंदीनुसार सर्वाधिक गंभीर स्थित नंदुरबार तालुक्यात होती़ 91 दिवस तालुक्यात पावसाचा थेंब कोसळलेला नव्हता़ गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात पावसाचे खंड सातत्याने वाढले आहेत़ 2014 मध्ये 50 दिवस, 2015 मध्ये 36, 2016 मध्ये 58 तर 2017 मध्ये 67 दिवस जिल्ह्यात पाऊस कोसळलेला नाही़ 2016 मध्ये नवापूर तालुक्यात 2 दिवस, तळोदा तालुक्यात 2 आणि धडगाव तालुक्यात 1 दिवस 60 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला़

4नंदुरबार तालुक्यात गेल्यावर्षी केवळ 38 दिवस पावसाचे होत़े आलेला हा पाऊस 50 मिलीमीटरपेक्षा कमीच होता़नवापूर तालुक्यात 43 दिवस पावसाचे होत़े येथे 641 मिलीमीटर पाऊस झाला़ यात केवळ एका दिवस 144 मिलीमीटर पाऊस झाला़शहादा तालुक्यात 28 दिवस पाऊस कोसळला़ येथे एकादाही 60 मिलीमीटरपेक्षा एकही पाऊस झाला नाही़ 337 मिमी पाऊस झाला़तळोदा तालुक्यात 485 मिलीमीटर पाऊस झाला़ परंतू येथे केवळ 39 दिवस पाऊस होता़ प्रथम या तालुक्यात कमी दिवस पाऊस पडला़धडगाव तालुक्यात 43 दिवसात 694 मिलीमीटर पाऊस झाला़ यात केवळ दोन वेळा 60 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला़  अक्कलकुवा तालुक्यात 60 दिवसात 896 मिलीमीटर पाऊस झाला होता़ परंतू खंड कायम असल्याने दुष्काळी स्थिती आह़े 

पावसातील खंडांमुळे मृदा आणि जलसंधारण होऊ शकलेले नाही़ ही गंभीर बाब आह़े शेतात पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाल्याने जमीनीची तहान भागत नाही़ पुनर्भरणाच्या योजना आता अधिक गतीने राबवणे गरजेचे आह़े शेतक:यांना पिक उत्पादन वाढ करण्यापेक्षा दोन वर्षे जलसंधारणाचे धडे द्यावे लागतील़ गेल्या पाच वर्षात भूजल पातळी खाली गेल्याने शेतक:यांचे सर्वाधिक नुकसान झाले आह़े  - राजेंद्र दहातोंडे, समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबाऱ