शेतकऱ्यांना बसणार कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 01:14 PM2020-03-27T13:14:31+5:302020-03-27T13:14:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे जनजीवन हवालदिल झाले असतानाच वेधशाळेने अवकाळी पावसाचा इशारा दिल्यानंतर परिसरातील हजारो ...

Millions hit by farmers | शेतकऱ्यांना बसणार कोट्यवधींचा फटका

शेतकऱ्यांना बसणार कोट्यवधींचा फटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे जनजीवन हवालदिल झाले असतानाच वेधशाळेने अवकाळी पावसाचा इशारा दिल्यानंतर परिसरातील हजारो शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतात पीक तयार आहे, व्यापारी माल खरेदी करायला तयार आहेत मात्र पीक कापणीसाठी मजुरांना ग्रामस्थ गावात येऊ देत नाही व पीक कापणीनंतर वाहतुकीला जिल्हाबंदी व आंतरराज्यबंदी असल्याने आसमानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता मदतीसाठी केंद्र शासनाने विशेष धोरण जाहीर केले पाहिजे, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.
सर्वाधिक सधन शेतीबाबत संपूर्ण खान्देशात शहादा तालुका प्रख्यात आहे. येथे पिकणारी केळी व पपई या पिकाच्या निर्यातीमुळे केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही शहाद्याची स्वतंत्र ओळख आहे. मात्र कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत राज्यात संचारबंदी व १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन परिस्थिती जाहीर केल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकºयांना सोसावा लागणार आहे. परिसरात केळी व पपई नाशवंत फळपिके कापणी व निर्यातीसाठी योग्य असताना केवळ त्याची कापणी होत नसल्याने शेतातच उभी आहेत. अनेक केळीचे घड झाडावरून खाली जमिनीवर पडले आहेत तर पपईसुद्धा झाडावरच पिकू लागली असून पिवळी होत आहे. परिणामी अशीच परिस्थिती कायम राहिली तर शेतकºयांना कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.
पपईच्या दराबाबत शेतकरी व व्यापारी संघर्षामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पपईही तोड बंद होती. अशा परिस्थितीत केंद्र शासनाच्या निर्णयामुळे वाहतूकदारांना वाहतूक पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहे. व्यापारी आता शेतकºयांचा माल खरेदी करायला तयार आहेत मात्र वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध असली तरी पपई व केळी ही पंजाब, हरियाणा, दिल्ली या राज्यांसह केळीची निर्यात आखाती देशात परदेशात होत असल्याने केवळ जिल्हा व आंतरराज्यबंदीमुळे शेतकºयांसह व्यापारी हवालदिल झाले आहेत. त्यातच अनेक गावकºयांनी आपल्या गावात परगावच्या नागरिकांना येण्यास व वास्तव्यास मनाई केल्याने व्यापाºयांकडे मजुरांची उपलब्धता आहे. मात्र या मजुरांना गावात येण्यास गावकºयांनी मनाई केली असल्याने व्यापारीही हतबल झाले आहेत.
याव्यतिरिक्त तालुक्यात गहू, हरभरा, कांदा, ज्वारी या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. संचारबंदी जारी होण्यापूर्वी अनेक शेतकºयांनी त्यांच्या शेतातील पिकाची मळणी करून उत्पादन हे घरी अथवा खळ्यांमध्ये जमा करून ठेवले आहे. त्याचप्रमाणे अनेक शेतकºयांचे पीक शेतात तयार आहे. मात्र संचारबंदीच्या आदेशामुळे मजुरांची उपलब्धता होत नसल्याने शेतातच पीक आता करपायला लागले आहे. त्यातच ३१ मार्चपर्यंत शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसह मध्य प्रदेशातील खेतिया बाजार समितीचे सर्व व्यवहार ठप्प झाले असल्याने घरी शेतमाल आहे मात्र त्याची विक्री शेतकरी बाजार समितीत करू शकत काही. अशी परिस्थिती असताना वेधशाळेने व हवामान खात्याने खान्देशात अवकाळी पावसाचा इशारा दिला असल्याने परिसरातील शेतकरी आसमानी व मानवनिर्मित सुलतानी संकटात सापडला आहे. शेतकºयाला वाचविण्यासाठी केंद्र शासनाने आता योग्य नियोजन व धोरण ठरवून शेतमाल विक्रीसाठी उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे

शहादा परिसरातील हजारो शेतकºयांच्या शेती उत्पादनाची कापणी व विक्री झाली नाही तर शेतकºयांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांनी आंतरराज्य वाहतूक व्यवस्था सुरू करण्यासाठी शेतकºयांच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करून पाठपुरावा करावा. अशा आशयाच्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडे दिले आहे.

Web Title: Millions hit by farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.