शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

मोहिदे गावाजवळ बेवारस स्थितीत मीटर आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा ते जयनगर रस्त्यावरील मोहिदे ते सोनवद दरम्यान वनविभागाच्या हद्दीत नवीन वीज मीटर बेवारस ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा ते जयनगर रस्त्यावरील मोहिदे ते सोनवद दरम्यान वनविभागाच्या हद्दीत नवीन वीज मीटर बेवारस स्थितीत आढळून आले. वीज कंपनीच्या कर्मचा:यांनी हे मीटर येथून उचलले असून याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे.तालुक्यातील मोहिदेतर्फे शहादे गावाच्या पूर्वेस वनविभागाच्या हद्दीत काटेरी बाभळींमध्ये मोठय़ा प्रमाणावर नवे वीज मीटर फेकून दिल्याचे आढळून आले. ही घटना जागरुक नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांना कळवूनही सुरुवातीला टाळाटाळ केली. मात्र नंतर घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यावर विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचा:यांनी घटनास्थळी येऊन वीज मीटर इतरत्र हलवले. या वेळी उपस्थित असलेले मोहिदे त.श. ग्रामपंचायतीचे सदस्य ईश्वर महिरे यांनी या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी वरिष्ठांकडे केली. कारण मोहिदे त.श. गावातील अनेक नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे वीज जोडणीसाठी अर्ज केले आहेत. मात्र वीज मीटर नसल्याचे कारण सांगत आजर्पयत विद्युत जोडणी दिलेली नाही. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर वीज मीटर काटेरी वनात फेकून दिल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे मीटर खाजगी ठेकेदारांना बसवण्यासाठी दिले होते का? वीज वितरण कंपनीने याबाबत खुलासा करणे गरजेचे आहे. तसेच मीटर जर चोरीला गेले असतील तर पोलिसात फिर्याद दिली होती का? पोलिसात फिर्याद दिली असेल तर वीज वितरण कर्मचा:यांनी वीज मीटर परस्पर का नेले? वीज वितरण कंपनीच्या भांडारगृहात आवक-जावकवरून सिरीयल क्रमांक  असलेले ते मीटर कुणाला दिले होते? खाजगी ठेकेदाराला का?  की कर्मचा:यांना? खाजगी ठेकेदाराने  वीज मीटर बसविण्यात कामचुकारपणा तर केला नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून याबाबत चौकशी करण्याची मागणी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी केली.