महोत्सवाद्वारे ‘महू’तील साखरेचे मोजमाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:59 PM2018-04-19T12:59:50+5:302018-04-19T12:59:50+5:30

आदिवासी बांधवांचा सहभाग : दुर्गम भागातील चोंदवाडे येथे उपक्रम

Measurements of 'Mhow' Sugar Measurement by Festival | महोत्सवाद्वारे ‘महू’तील साखरेचे मोजमाप

महोत्सवाद्वारे ‘महू’तील साखरेचे मोजमाप

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 19 : तालुक्यातील चोंदवाडे येथे महू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होत़े याद्वारे महू फुलातील साखरेचे प्रमाण जाणून घेत, त्याची माहिती आदिवासी बांधवांना देण्यात आली़ 
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग व बायफ मित्र संस्थेच्या महाराष्ट्र जीन बँक कार्यक्रमांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होत़े यात चोंदवाडे, आंबाबारी, बोरवण, खरवड, चोंदवाडे खुर्द येथील ग्रामस्थ सहभागी झाले होत़े यावेळी संस्थांचे अधिकारी आणि आदिवासी बांधव यांच्या पुढाकाराने फुल आणि महू झाडांतील साखरेचे प्रमाण तपासण्यात आल़े यात कमीत कमी 14 तर जास्तीत जास्त 28 टक्के साखर असल्याचे निष्पन्न झाल़े चोंदवाडे येथील नाना पावरा यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम गेल्या दोन वर्षापासून घेण्यात येत आह़े कल्पवृक्ष महूच्या विविध प्रजातींना एकत्र करून त्यापासून विविध पदार्थ तयार करण्याची स्पर्धा याप्रसंगी घेण्यात आली़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी नमु पावरा, लिनेश चव्हाण, काळूसिंग पावरा, सविता पावरा, सुनंदा पावरा, रणज्या पावरा, वसंत पाडवी, मेराली याहा शेती गट, जय किसान पुरूष गट, महिला बचत गट, बायफ संस्थेचे जिल्हा समन्वयक यांनी परिश्रम घेतल़े महिलांनी घरून तयार करून आणलेल्या विविध पदार्थाची चव यावेळी चाखण्यात आली़ महू फुलापासून तयार होणा:या पदार्थाची माहिती मिळावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला होता़ महोत्सवात महिलांनी शरबत, लाडू, खीर, भजी, ताये (हिते), ऊसळ, भाजलेले महू , राबडी, महू फुलांचे बोंडे, को:या, मोहाच्या चिंचोडे, चकल्या, महू चटणी, मोवसी, मोहाच्या लाटा, डुकल्या आदी पदार्थ तयार करून आणले होत़े गुल्ली महू, रातगोल महू, डुंडाल महू, सिकटयाल महू, सिडणी महू, फाटाळ महू आदी सहा महू झाडांच्या प्रजातींद्वारे येणा:या 39 प्रकारच्या महू फुलांचा अभ्यास यावेळी करण्यात आला़ दोन वर्षापासून होणा:या उपक्रमाची माहिती मिळत असल्याने ठिेकठिकाणचे नागरिक या उपक्रमास हजेरी लावत होत़े यावेळी महू झाडांची संख्या वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली़ 
 

Web Title: Measurements of 'Mhow' Sugar Measurement by Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.