कार्यशाळेचे उद्घाटन मुख्याध्यापिका सुषमा शाह यांच्या हस्ते सर सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना ‘मॅटिफिक’ ॲपच्या माध्यमातून गणितीय संकल्पना सोप्या व हसत-खेळत शिकता व शिकवता येतील आणि गणित विषयाची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून काढता येईल. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षिका विद्या सिसोदिया, जगदीश पाटील, प्रमोद गवांदे, सुरेखा दाणेज, संजयसिंह सिसोदिया, अनिल शाह, सुनील शाह, गीता महाजन, चेतना पाटील, हर्षिता पाटील, प्रतिभा साळुंखे व विज्ञान शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक अटल टिंकरिंग लॅब प्रमुख व विपनेट क्लबचे समन्वयक राजेंद्र मराठे यांनी केले. जितेंद्र बारी यांनी ॲपच्या माध्यमातून गणित सोप्या पद्धतीने कशाप्रकारे सोडवता येतील याचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखविले. पियुष महाजन याने कार्यशाळेविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मधुरा कुलकर्णी व कृष्णा मोटवानी यांनी केले. कार्यशाळेसाठी जगदीश वंजारी, हेमंत लोहार, शिवाजी माळी यांनी सहकार्य केले.
श्रॉफ हायस्कूलमध्ये मॅटिफिक कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:58 IST