शिबिरास नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे विभागीय अध्यक्ष वसंत लोढा, कार्याध्यक्ष गोपाळ पाटील, उपाध्यक्ष प्रकाश गवळी, फेडरेशनचे विभागीय संचालक बाळासाहेब रावताळे, श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन रमेशचंद जैन आदी उपस्थित होते.
या वेळी लोढा म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातील नागरिक सहकारी ग्रामीण बिगरशेती अशा विविध सहकारी संस्था गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत आलेल्या आहेत. पतसंस्थांवर केंद्र शासनाने लावलेले अटी-नियम ह्या रद्द कराव्या. पतसंस्थांच्या माध्यमातून तळागाळातील माणसांना तातडीने कर्ज उपलब्ध होत असते. मात्र शासनाच्या अटींमुळे पतसंस्था व सभासदांवर आर्थिक भार पडत आहे. या जाचक अटी रद्द करण्यासाठी व सहकारी संस्थेच्या सर्व सदस्यांनी आपली संस्था शाबूत ठेवण्यासाठी येत्या काही दिवसात रस्त्यावर उतरावे लागणार आहे. येत्या काही दिवसात अहमदनगर येथे राज्यस्तरीय फेडरेशनची बैठक झाल्यानंतर नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली. प्रास्ताविक रमेशचंद जैन यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र जैन यांनी केले. या वेळी पतसंस्थांचे चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी उपस्थित होते.