शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

तळोद्यात आजही बाजारपेठ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 11:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा/कोठार : निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर तळोदा शहर बुधवार दुपारी तीन वाजेपासून गुरूवारी दिवसभर बंद ठेवण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा/कोठार : निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर तळोदा शहर बुधवार दुपारी तीन वाजेपासून गुरूवारी दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी तळोदा येथील उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.निर्सग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची तत्काळ बैठक घेण्यात आली होती. बैठकीस उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा, मुख्याधिकारी सपना वसावा, नगराध्यक्ष अजय परदेशी, तहसीलदार पंकज लोखंडे, पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, बांधकाम विभागाचे उपअभियंता पी.जे. वळवी, विद्युत वितरण अभियंता सचिन काळे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सहाय्यक गटविकास अधिकारी आर.बी. सोनवणे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.या बैठकीत बुधवारी दुपारी तीन वाजेपासून ते गुरूवारी संपूर्ण दिवस बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने पालिकेच्या माध्यमातून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय पालिकेने नदी काठच्या लोकांना सतर्क करून नाला खोलीकरण व गटारींमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर राबवावे. तसेच कच्च्या घरातील लोकांना जिल्हा परिषद शाळा, समाज मंदिरे येथे शिफ्ट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पाण्याच्या निचऱ्यात अडथळा ठरणारे मार्ग मोकळे करावे, आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या.उपविभागीय कार्यालयात नियंत्रण कक्ष साकारण्यात आला आहे.या नियंत्रण कक्षातून गाव पातळीवर तलाठी व ग्रामसेवकांशी चोवीस तास संपर्क राहणार आहे. ग्रामसेवक व तलाठी यांना मुख्यालय न सोडण्याच्या इशारा देण्यात आला आहे.