सातपुडय़ातील दुर्गम भागात सहा मार्च र्पयत होळी व मेलादे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:16 PM2018-02-23T13:16:03+5:302018-02-23T13:16:03+5:30

By March 6 in remote areas of Satpura, Holi and Melade | सातपुडय़ातील दुर्गम भागात सहा मार्च र्पयत होळी व मेलादे

सातपुडय़ातील दुर्गम भागात सहा मार्च र्पयत होळी व मेलादे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : सातपुडय़ाच्या दुर्गम व अती दुर्गम भागात येत्या 26 फेब्रुवारीपासून होळीला सुरूवात होणार आह़े डाब (मोरीराही) ता़ अक्कलकुवा येथे होळी पेटवल्यानंतर ठिकठिकाणी होणा:या होळी व मेलाद्यांचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आह़े 
डाब येथील देवाच्या होळीनंतर 27 रोजी रात्री खुंटामोडी ता़ धडगाव येथे होळी पेटवून 28 रोजी दुपारी खुंटामोडी येथे मेलादा भरवण्यात येणार आह़े यानंतर 28 रोजी वेरी ता़ धडगाव येथे होळी पेटवली जाईल़ यानंतर 1 मार्च रोजी पहाटे काठी ता़ अक्कलकुवा येथील रजवाडी होळी पेटवली जाईल़ काठीच्या होळीनंतर मोलगी ता़ अक्कलकुवा येथे 2 मार्च रोजी होळी व 3 मार्च रोजी मेलादा होणार आह़े यानंतर 3 मार्च रोजी असली व जामली ता़ धडगाव येथे होळी व 4 मार्च रोजी मेलादा होणार आह़े 4  रोजी पहाटे जमाना ता़ अक्कलकुवा, वडखिली व धनाजे ता़ धडगाव येथे होळी पेटवून मेलादा भरवण्यात येणार आह़े 5 मार्च रोजी धडगाव तालुक्यातील भोगवाडे येथे होळी पेटवण्यात येऊन 6 मार्च रोजी मेलादा होणार आह़े होळीचे वेळापत्रक जाहिर झाल्यानंतर दुर्गम भागातून आदिवासी बांधव आणि युवक हे तयारीला लागले असून त्यांच्याकडून बावा, बुध्या, मोरखी,  बनण्याच्या तयारीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यात येत आह़े 
होळीसणासाठी गुजरात राज्यात स्थलांतरित झालेले आदिवासी बांधवही कुटूंबांसह धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आपल्या मूळ गावी परतत असल्याने गावे पुन्हा गजबजू लागली आहेत़ 

Web Title: By March 6 in remote areas of Satpura, Holi and Melade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.