शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

मनीष जैन यांच्यासह चौघांना वर्षभर कारावास

By admin | Updated: June 9, 2015 03:02 IST

धनादेशाच्या अनादरप्रकरणी येथील महावीर नागरी सहकारी पतपेढीचे तत्कालीन चेअरमन व माजी आमदार मनीष जैन यांच्यासह चौघांना प्रत्येकी एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

जळगाव: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिलेल्या ३ कोटी रुपयांच्या धनादेशाच्या अनादरप्रकरणी येथील महावीर नागरी सहकारी पतपेढीचे तत्कालीन चेअरमन व माजी आमदार मनीष जैन यांच्यासह चौघांना प्रत्येकी एक वर्ष कारावासाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायाधीश ए.एम.मानकर यांनी ठोठावली आहे. अन्य आरोपींमध्ये पतपेढी, तत्कालीन व्हाईस चेअरमन महेंद्र लुंकड व कार्यकारी संचालक सुभाष सांखला आणि तत्कालीन व्यवस्थापक विश्वनाथ रामसिंग पाटील यांचा समावेश आहे. नंतर अपिलात जाण्यासाठी त्यांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली व जामीनही मंजूर केला. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास हा निकाल देण्यात आला. अशाच एका दुसर्‍या खटल्यात अन्य चौघांना एक वर्ष कारावास व ७ कोटी रु. भरपाईचा आदेश मानकर यांनी दिला आहे. भरपाईपोटी सर्वांनी मिळून महिनाभरात चार कोटी रु. न्यायालयात भरावे, असेही निकालात नमूद आहे. निकालाच्या वेळी मनीष जैन यांच्यासह चौघे न्यायालयात उपस्थित होते. बँकेचे प्राधिकृत अधिकारी भिला शामराव पाटील हे फिर्यादी होते. बँकेतर्फे ॲड.सागर चित्रे आणि मनीष जैन यांच्यातर्फे ॲड.रवींद्र पाटील, भादलीकर यांनी काम पाहिले. पतपेढी आणि लुंकड व साखला यांच्यातर्फे ॲड.नलिनकुमार शाह यांनी आणि विश्वनाथ पाटील यांच्यातर्फे ॲड.शरद न्हायदे यांनी काम पाहिले. २२ ऑक्टोबर २००२ च्या व्यवहारानुसार जिल्हा बँकेकडून मंजूर ८ कोटी रुपयांच्या कर्जापोटी पतपेढीने जिल्हा बँकेला अकोला अर्बन बँकेचा ३ कोटींचा धनादेश १ ऑक्टोबर २००३ ला दिला होता, मात्र तो त्याच दिवशी न वटता परत आला. यामुळे जिल्हा बँकेने पतपेढी आणि चौघांना १८ ऑक्टोबरला नोटीस पाठवली पण पूर्तता न झाल्याने २७ नोव्हेंबर २००३ ला रितसर फिर्याद दाखल केली.पुढे प्रत्यक्ष सुनावणीच्या तारखेस फिर्यादी न्यायालयात हजर न राहिल्याने डिस्मिस् फॉर डिफॉल्ट मानून खटला निकाली काढण्यात आला. त्यावर फिर्यादीने दाद मागितली असता खंडपीठाने खटल्याचे कामकाज पूर्ववत चालवण्याचे आदेश दिले. बँकेतर्फे फिर्यादी, भिला शामराव पाटील, दुसरे अधिकारी मधुकर तुकाराम चौधरी आणि तत्कालिन चेअरमन व माजी खासदार वसंतराव मोरे यांच्या साक्षी झाल्या. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम १३८ (धनादेशाचा अनादर) नुसार गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने ग्रा‘ धरुन फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम २५५ (२) नुसार एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय पतपेढीला २५ हजार रु.दंड आणि फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ३५७ नुसार सर्व आरोपींनी मिळून ४ कोटी रु.भरपाईदाखल एक महिन्यात न्यायालयात भरावे, असेही आदेशात नमूद केले आहे. -----------------अपिलात जाणार....न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे.पतपेढीने बँकेची बहुतांश रक्कम अदा केलेली आहे. धनादेश टाकण्यात आला तेव्हा मला सहीचे अधिकार नव्हते. ३ डिसेंबर २०१२ च्या ठरावानुसार पतपेढीने सुरेश टाटिया, सुरेंद्र लुंकड, सुभाष सांखला, विश्वनाथ रामदास पाटील या चौघांपैकी कोणत्याही तिघांच्या स्वाक्षरीने बँकींग व्यवहारावर स‘ा करण्याच्या अधिकारात बदल झालेला आहे, तसे बँकेला पतपेढीने कळवलेले आहे. तांत्रिक कारणामुळे निकाल विरोधात गेला असला तरी अपिलात आपल्याला न्याय मिळेल. लवकरच अपिल दाखल करू.-मनीष जैन, माजी आमदार