शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

दहा रिक्त पदांमुळे मंदाणे आरोग्य केंद्राचे कामकाज वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:27 IST

शहादा तालुक्याच्या पूर्व आदिवासी व ग्रामीण भागातील मध्यप्रदेश सीमेलगत असलेले मंदाणे हे मध्यवर्ती व बाजारपेठेचे गाव आहे. या गावाशी ...

शहादा तालुक्याच्या पूर्व आदिवासी व ग्रामीण भागातील मध्यप्रदेश सीमेलगत असलेले मंदाणे हे मध्यवर्ती व बाजारपेठेचे गाव आहे. या गावाशी सुमारे ४० ते ४५ खेडेगावातील नागरिकांची दैनंदिन बाजारहाट व अन्य कामांसाठी मोठी वर्दळ असते. या ठिकाणी स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित आहे; मात्र येथील विविध समस्या पाहिल्यास आरोग्य केंद्राचेच आरोग्य धोक्यात आलेले आहे. जमीनदोस्त झालेले वॉल कंपाऊंड, शस्त्रक्रिया इमारतीची झालेली पडझड, वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाची मोडकळीस आलेली इमारत, पाण्याची तीव्र समस्या, कर्मचाऱ्यांची कमतरता, शवविच्छेदन गृह फक्त नावालाच अशा विविध समस्या असल्याने या समस्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे.

१० जागा रिक्त

मंदाणे आरोग्य केंद्रात दैनंदिन रुग्णांची संख्या मोठी असते. या भागातील शहाणे व वाघर्डे येथे स्वतंत्र आरोग्य केंद्र कार्यान्वित असले तरी या दोन्ही आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावे ही मंदाणे गावाच्या जवळपास असल्याने तेथील रुग्णांना मंदाणे गाव आरोग्य केंद्रात येणे सोयीचे असल्याने याच आरोग्य केंद्रात रुग्णांची मोठी गर्दी असते; मात्र या केंद्रात आस्थापनेवरील कर्मचारी संख्या अपूर्ण असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. सर्व भार आरोग्य सेविकांवर आहे. या केंद्रात औषध निर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही दोन्ही पदे एक वर्षापासून रिक्त आहेत. त्यामुळे औषधी व गोळ्या वाटपाचे कामही आरोग्य सेविकांना करावे लागते. रुग्णाचे रक्त व लघवी तपासणी कर्मचाऱ्यांअभावी केली जात नसल्याने रुग्णांवर योग्य उपचार करण्यास अडचणी येत आहेत. यामुळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पद तातडीने भरणे अत्यावश्यक आहे. तसेच मंदाणे आरोग्य उपकेंद्र क्रमांक एकमध्ये आरोग्यसेविका व एमपीडब्ल्यू दोन्ही पदे रिक्त आहेत. मंदाणे उपकेंद्र क्रमांक २ व असलोद उपकेंद्र या दोन्ही ठिकाणी देखील एमपीडब्ल्यू ही पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर याच आरोग्य केंद्रात शिपाई एक,सफाईगार एक, लिपिक एक तसेच आरोग्य केंद्रातील ओपीडीसाठीचे आरोग्य सेविकेचे पदही रिक्त आहे .एकूण १० पदे रिक्त असल्याने खूप गैरसोय होत आहे. डॉक्टरने रुग्णांची तपासणी केल्यानंतर पुढील सर्व भार आरोग्यसेविकांवर येतो. त्यात रुग्णाला इंजेक्शन देणे, ड्रेसिंग करणे, गोळ्या औषधे देणे ,गावात विविध आरोग्य उपक्रमात सहभागी होणे अशी कामे करणे आरोग्यसेविकांना अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे येथील सर्व पदे तातडीने भरली जावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोरोना महामारीची भर

या आरोग्य केंद्रात संख्या अपूर्ण असताना येथील सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कोरोना महामारीमुळे कामाचा ताण वाढलेला आहे. त्यामुळे काम करणे कसरतीचे ठरत आहे. मंदाणे व परिसरात कोरोना बाधितांची संख्या व मृत्यूसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ही महामारी आटोक्यात आणणे आरोग्य कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करत आहे. लसीकरण करणे, कोरोना टेस्ट करणे, सर्व्हे करणे, बाधित रुग्णांवर प्राथमिक उपचार करणे, त्यांना मोठ्या रुग्णालयात रवाना करणे, विलगीकरण कक्षात दाखल करणे एवढ्या कामाचा भार वाढलेला असताना जिल्हा परिषद प्रशासनाचे या भागाकडे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाला येथील रिक्त जागा तातडीने भरण्यासंबंधी आदेशित करावे अशी मागणी नागरिकांनी केली.