शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
2
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
3
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
4
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
5
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
6
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
7
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
8
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
9
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
10
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
11
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
12
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
13
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
14
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
15
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
16
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
17
डेली SIP की मासिक SIP? म्युच्युअल फंडात जास्त फायदा कशात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला
18
उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले, “आता लवकरच...” 
19
रिलायन्सचा वर्षात २७ टक्क्यांचा दमदार परतावा! भविष्यात किती वाढ होईल?, ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट
20
आधी पत्नीला संपवलं, नंतर पतीने स्वतःही घेतला जगाचा निरोप; मरणापूर्वी भिंतीवर लिपस्टिकने लिहिली संपूर्ण कहाणी!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : राजकारणाचा डावही बदलला अन् भिडूही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 04:32 IST

नंदुरबार जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला.

- रमाकांत पाटीलनंदुरबार जिल्ह्यातील राजकारणाचा सारीपाट गेल्या महिनाभरातील घडामोडींमुळे पूर्णत: बदलला आहे. पक्षांतराच्या लाटेत काँग्रेसचे नेते भाजपत आणि शिवसेनेत आले तर भाजपचे आमदार काँग्रेसचे उमेदवार झाल्याने या जिल्ह्यातील राजकारणाचा डावही बदलला असून भिडूही बदलले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाचा डाव कोण जिंकणार हा एक औत्सुकतेचा विषय ठरला आहे.नंदुरबार जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला. माणिकराव गावीत आणि सुरुपसिंग नाईक या जोडीने जिल्ह्यात पाच दशके राजकारणाची सूत्रे हाती ठेवली. आता मात्र हे दोन्ही नेते वयोमानाने थकल्याने त्यांचे वारसदार निवडणुकीच्या रिंगणात आले आहेत. विशेष म्हणजे नाईक-गावीतांची मैत्री घट्ट होती. पण या निवडणुकीत त्यांचे वारसदार एकमेकांच्या विरोधात नवापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसतर्फे शिरीष नाईक तर भाजपतर्फे भरत गावीत हे उमेदवारी करीत असल्याने ही लढत लक्षवेधी ठरली आहे.दुसरीकडे पक्षांतराच्या लाटेत अनेक नेत्यांनी दल बदलल्याने विधानसभेची ही निवडणूक जिल्ह्यासाठी राजकारणाची नवी दिशा ठरवणारी आहे. जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेसतर्फे सलग सातवेळा आमदार असलेले अ‍ॅड.के.सी. पाडवी हे पुन्हा उमेदवारी करीत आहेत. त्यांना यावेळी शिवसेनेचे आमशा पाडवी यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. अर्थात यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने ही जागा जिंकण्यासाठी रघुवंशी आपली प्रतिष्ठा पूर्णपणाला लावणार त्यामुळे येथील लढतही रंगतदार ठरणार आहे. शहादा मतदारसंघात भाजपचे आमदार उदेसिंग पाडवी यांचे पुत्र राजेश पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. ते मुंबईला पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी हे रिंगणात आहेत. याठिकाणी अपक्ष उमेदवारही रिंगणात राहणार असल्याने येथील निवडणूक देखील चुरशीची ठरणार आहे.

पक्षांतराने रंगतभाजपचे आमदार उदेसिंग पाडवी यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी रातोरात काँग्रेस पक्षात प्रवेश करुन ऐनवेळी आपला मतदारसंघ सोडून नंदुरबार मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली. याठिकाणी काँग्रेसला सक्षम उमेदवार नव्हता. पण रात्रीतून घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी नंदुरबार मतदारसंघातील लढत रंगतदार केली आहे.आघाडीच्या वाटाघाटीत शहादा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्याने राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत यांनी नाराजी व्यक्त करीत पक्ष सोडला. त्यामुळे जिल्ह्यात या पक्षाचे आता प्रभावी कार्यकर्ते कुणीही नाही. माजी आमदार शरद गावीत हेदेखील नवापूरमधून इच्छुक होते. पण त्यांनीही पक्ष सोडला आणि नवापुरातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.अक्कलकुवा युतीने शिवसेनेला सोडला आहे. त्यामुळे येथे महिनाभरापूर्वी उमेदवारीच्या अपेक्षेने भाजपत गेलेले विजय पराडके व किरसिंग वसावे या दोन्ही कार्यकर्त्यांनी पुन्हा भाजपमधून १५ दिवसात शिवसेनेत प्रवेश केला आहे.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nandurbar-acनंदुरबार