खेतियात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 12:21 PM2020-04-06T12:21:07+5:302020-04-06T12:21:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मध्य प्रदेश-महाराष्टÑ सीमा पूर्णत: बंद करण्यात आली असून खेतिया येथे विनाकारण ...

Look through the drone camera in the field | खेतियात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर

खेतियात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मध्य प्रदेश-महाराष्टÑ सीमा पूर्णत: बंद करण्यात आली असून खेतिया येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर ड्रोन कॅमेºयाद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. अत्यावश्यक काम असेल तर शहरी भागात पालिका मुख्याधिकारी व ग्रामीण भागात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बडवाणीचे जिल्हाधिकारी अमित तोमर यांनी केले आहे.
बडवाणी जिल्ह्यातून कोणीही बाहेर जाऊ व येऊ शकणार नाही यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन काळात मेडिकल, भाजीपाला, दूध, किराणा आदी अत्यावश्यक सेवा असलेली दुकाने दिेलेल्या वेळेत सुरू आहेत. या व्यावसायिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे व कर्मचारी खेतिया शहर व ग्रामीण भागात गस्त घालून विनाकारण फिरणाºयांना चोप देत आहेत. तसेच खेतिया ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवण्याचे काम सुरु आहे. प्रांताधिकारी सुमेरसिंह मुजाल्दे, तहसीलदार राकेश सस्तिया, नायब तहसीलदार जगन्नाथ वास्कले, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ राठोड यांनी शहर व ग्रामीण भागात जाऊन नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करीत आहेत.
खेतिया हे मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवर असून चेकपोस्टवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बडवाणीचे पोलीस अधीक्षक डी.आर. तेनिवार यांनी खेतिया चेकपोस्टला भेट देऊन पाहणी केली. खेतिया येथे युवा मिशन ग्रुपतर्फे खेतिया शहरात गोरगरीब, मोलमजुरी व गरजूंना भोजनाचे पाकीट तयार करून वाटप करण्यात येत आहेत. शहर व ग्रामीण भागातही सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींकडून गरजूंना जेवणासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.

खेतिया येथे पोलीस ठाण्याच्या आवारात सोशल डिस्टन्सिंग राखत शांतता समितीची बैठक झाली. तहसीलदार राकेश सस्ते, नायब तहसीलदार जगन्नाथ वास्कले व खेतिया प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.अरविंद किराडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे व समितीचे सदस्य उपस्थित होते. तहसीलदार सस्ते व नायब तहसीलदार वास्कले यांनी सांगितले की, आर्थिक दुर्बल व गरीब परिवारांना तीन महिन्याचे राशन वाटप करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब परिवाराला शासनतर्फे देण्यात येणारी रक्कमही त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. आपल्या परिसरात अनोळखी नागिरक दिसल्यास तात्काळ पोलीस स्टेशन, नगरपालिकेला कळविल्याचे आवाहन त्यांनी केले. नगरपालिकेतर्फे दररोज साफसफाई व मशीनद्वारे फवारणी करण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी ईश्वर महाले यांनी दिली.

Web Title: Look through the drone camera in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.