पशुधन अधिकाऱ्याच्या संपर्कातील अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 11:56 AM2020-06-07T11:56:56+5:302020-06-07T11:57:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : मालेगाव येथील रहिवासी व सारंगखेडा येथील पशुधन विकास अधिकाºयाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या ...

Livestock officer contact report negative | पशुधन अधिकाऱ्याच्या संपर्कातील अहवाल निगेटीव्ह

पशुधन अधिकाऱ्याच्या संपर्कातील अहवाल निगेटीव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : मालेगाव येथील रहिवासी व सारंगखेडा येथील पशुधन विकास अधिकाºयाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील दहापैकी चार जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शुक्रवारी रात्री या चारही जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने सारंगखेडा ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सारंगखेडा येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर मालेगाव येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कातील दोन सहायक पशुधन विकास अधिकारी व परिचर यांच्यासह दहा जणांना शहादा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते.
या दहा जणांपैकी चार जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यात परिचर, दोन्ही सहायक पशुधन विकास अधिकारी व एका महिलेचा समावेश होता. शुक्रवारी रात्री या चारही जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्याकडे प्राप्त झाली. हे अहवाल निगेटीव्ह आल्याने सारंगखेडा ग्रामस्थांनी नि:श्वास सोडला आहे.
३० मे रोजी पशुधन विकास अधिकारी पॉझिटीव्ह असल्याची माहिती मिळाल्यानंततर पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाची तारांबळ उडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून सारंगखेडा गावात तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला होता. मात्र त्यांच्या संपर्कातील चार जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
३० मे रोजी संबंधित पशुधन विकास अधिकाºयाला आपला अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे समजताच त्यांनी मोटारसायकलीने मालेगाव येथे जाऊन उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाले. ही माहिती त्यांनी सहकाºयांना देताच त्यांच्या संपर्कातील सहकारी स्वत:हून शहादा येथील विलगीकरण कक्षात दाखल झाले. ही बाब आरोग्य विभागाने तातडीने सारंगखेडा ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने त्याचा उलगडा १ जून रोजी रात्री उशिरा झाला. त्यावरून या रुग्णाच्या संपर्कातील १० जणांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी तातडीने गावात बैठक घेऊन गाव तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
गावात विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रांताधिकाºयांनी संबंधित पशुधन विकास अधिकाºयाच्या वरिष्ठांना पत्र देऊन कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पुढे काय कारवाई होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून तूर्त चार जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Web Title: Livestock officer contact report negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.