आनंदी जीवन जगा-खगेंद्र महाराज शहादेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:49 IST2020-04-15T12:49:27+5:302020-04-15T12:49:33+5:30

अध्यात्म

Live a happy life | आनंदी जीवन जगा-खगेंद्र महाराज शहादेकर

आनंदी जीवन जगा-खगेंद्र महाराज शहादेकर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आनंद ही प्रसन्नतेच्या पुढची अवस्था आहे. अत्यानंदाला व्यक्त करताना अंत:करणाची गरज असते. मानवी जीवनात चार गोष्टी अशा आहेत की त्या कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी लपवता येत नाही. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे अहंकार. आपल्यात अहंकार नाही याचा कितीही भास निर्माण केला तरी वाणी आणि वर्तनातून तो कधी व्यक्त होतो ते कळत नाही. दुसरी आतुरता ! एखाद्या व्यक्तीच्या भेटीची आतुरता असेल तर तुम्ही कितीही गर्दीत असा पण येणाऱ्या व्यक्तीची वाट पाहण्याची क्रिया तन व मन लपवू शकत नाही. साºया गोपीकांमध्ये असणारी राधा भगवान श्रीकृष्णाची वाट पाहत होती. तिची आतुरता सर्वांच्या लक्षात येत होती. मुलीने फोन केला आई मी उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत येते तर दुसºया दिवशी सकाळी उठल्यापासून त्या आईजवळ कितीही महिला बसल्या असतील पण मुलीच्या येण्याची आतुरता काही वेगळीच असते. तिसरी गोष्ट म्हणजे अज्ञान! विद्वानांच्या सभेत अज्ञानी ओळखला जातो. ‘‘प्राप्नोतू वसंत समये काक: काक: पिक: पिक:’’ कोकीळेच्या सभेत एखादा कावळा असेल तो रंगाने झाकला जाईल पण जेव्हा बोलायची वेळ येईल तेव्हा कोकीळेचा आवाज कावळा काढू शकत नाही. तसे अज्ञान लपवता येत नाही. चौथी गोष्ट म्हणजे आनंद! एका राजाचे एक फर्मान काढले- उद्या संगीताची मैफील आहे, सर्वांनी श्रवणाला या. परंतु गायकाला दाद देऊन जो मान हलवेल त्याची मान कापली जाईल. दुसºया दिवशी आयोजन केले, खूप लोक आले. मैफील प्रारंभ झाली गाणे खूप रंगात आले गायकाने आलाप घेतला. पुढच्या क्रमांकावर एक संगीतप्रेमी बसला होता. त्याने अशी दाद दिली, तो इतका आनंदीत झाला, सर्व विसरला व व्वा व्वा करीत मान हलवली, आनंद लपवू शकला नाही. अनुवाण, अनुशोष, आर्तता हे आनंदातील अवरोध आहेत. अनुवाण म्हणजे वर्तमानातील दु:ख, हे आनंद घेऊ देत नाही. अनुशोष म्हणजे भविष्यातील दु:ख व आर्त म्हणजे भेटीचे दु:ख. ग्रंथात आनंदाचे अनेक प्रकार आहेत. श्रीमद् भागवतात पाच आनंद मुख्य आहेत. १) सच्चिदानंद २) परमानंद ३) प्रेमानंद ४) ब्रह्मानंद ५) आत्मानंद. म्हणून अखंडानंद सरस्वती महाराज भागवताला पंचानंद व पंचामृत असेही म्हणायचे सार एकच आहे. संन्याशी, पंडित, ज्ञानी, प्रपंची, सज्जन किंवा दुर्जन प्रत्येक व्यक्ती जीवनात आनंदाचीच अपेक्षा करतो.
सतत आनंदी रहा, हसते रहो, नाचते रहो...
-खगेंद्र महाराज शहादेकर
भागवतकार, शहादा

 

Web Title: Live a happy life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.